AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांच्या ‘त्या’ कॉल चा राज ठाकरेंनी किस्सा सांगितला, मागे कुणीतरी बोलत होतं? नितेश राणेंनी नावच सांगून टाकलं….

राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यातील जाहीर भाषणातील एका संदर्भाचा आधार घेऊन आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बाळासाहेबांच्या 'त्या' कॉल चा राज ठाकरेंनी किस्सा सांगितला, मागे कुणीतरी बोलत होतं? नितेश राणेंनी नावच सांगून टाकलं....
Image Credit source: Google
| Updated on: Mar 23, 2023 | 4:59 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळावा मध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यामध्ये राज ठाकरे यांनी नारायण राणे हे शिवसेना सोडून गेलेच नसते असा दावा केला होता. हा दावा करत असताना राज ठाकरे यांनी त्यावेळेला घडलेला प्रसंग सांगितला होता. त्यामध्ये एक कॉल आल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. बाळासाहेब ठाकरे बोलत असतांना त्यांनी मागे कुणीतरी बोलत होतं हे मला कळत होतं असं म्हंटलं होतं. नारायण राणे पक्षात थांबायला तयार होते असं म्हंटलं होतं. एकूणच राज ठाकरे यांनी हा प्रसंग सांगत असतांना नाव घेणं टाळलं होतं. पण रोख मात्र उद्धव ठाकरे यांच्यावरच होता.

शिवतीर्थावर केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी काही प्रसंग सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यामध्ये नारायण राणे यांना पक्षात थांबू नये यासाठी तो अखेरचा कॉल असतांना मागे कोण पुटपुटत होतं यावरून जोरदार चर्चा सुरू झाली होती.

त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिवसेनेतील अनेक नेत्यांची नावं घेतली जात होती. त्यावरून मात्र नितेश राणे यांनी थेट नाव घेऊनच उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. राज ठाकरे यांनी काल जे सांगितले तो मागून बोलणारा माणूस म्हणजे उध्दव ठाकरे असल्याचे नितेश राणे म्हणाले आहे.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दबाव टाकत नारायण राणे यांना भेटण्यासाठी रोखले. तुम्ही नारायण राणे यांना भेटले तर मुलबाळ सोबत मातोश्री सोडेल असं उद्धव ठाकरे म्हणल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

सगळे लोक उद्धव ठाकरे मुळे बाहेर पडले आहे. उद्धव ठाकरे ज्या पध्दतीने सहानुभूती घेत आहेत ते खोटारडे आहेत. महाराष्ट्र ला कळू द्या की का माणूस कसा आहे. अशी टीका नितेश राणे यांनी करत पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात प्रवेश करतांना एकत्र आले त्यावर ठाकरे आणि फडणवीस सोबत सभागृहात आल्याने काय होत काही नाही असेही मत नितेश राणे यांनी मांडत असतांना ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी आणि पेंग्विन गाडीतून उतरलो तर तो त्याच्या बाजूने चालणार मी माझ्या पद्धतीने चालणार. माझ्या बाजूने पेंग्विन गेला तर मी काय लाथ मारून ढकलनार का? असा सवाल उपस्थित करत नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.