कलिंगड खाल्ल्यानंतर पायधुनीत चौघांचा मृत्यू, हत्या की आत्महत्या? एफडीएचा धक्कादायक रिपोर्ट; सर्वच हादरले
मुंबईतील पायधुनी येथे डोकाडिया कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू हादरवून टाकणारा आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर तब्येत बिघडली, अवयव हिरवे पडल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे. एफडीएने कलिंगडात रसायन नसल्याचे म्हटले तरी, मॉर्फिनसदृश्य पदार्थाचा संशय आहे. ही हत्या की आत्महत्या, याचे गूढ फॉरेन्सिक अहवालानंतरच उलगडेल.

मुंबईतील पायधुनी येथे गेल्या आठवड्यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि एकच खळबळ माजली. रात्री बिर्याणी खाल्ली, त्यानंतर मध्यरात्री कलिंगड खआऊन डोकाडिया कुटुंब झोपलं पण पहाटे त्याना उलट्या, जुलाबांचा जबर त्रास झाला. त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं खरं मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. आई-वडील आणि दोन मुलींचा असा अकस्मात मृत्यू झाल्याच्या घटनेने सगळेच हादरले. याच प्रकरणाचा तपास सुरू असून रोज नवनवी माहिती समोर आहे. याच प्रकरणात आता मोठा सस्पेन्स समोर आला आहे.
कुटुंबाची हत्या की आत्महत्या?
डोकाडिया कुटुंबाने जे कलिंग खाल्लं, त्यात विषय मिसळल्याचा संशय तज्ज्ञांचा आहे. मात्र डोकाडिया कुटुंबाच्या कलिंगडामध्ये विष कोणी मिसळलं, या कुटुंबाची हत्या की आत्महत्या ? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. कलिंगडाला लाल रंग यावा म्हणून वापरण्यात येणारं कृत्रिम रसायन, हे कलिंगडामध्ये आढळलेलं नाही,असं FDA कडून सांगण्यात आलं आहे. तर कलिंगडामध्ये मॉर्फिनसदृश्य पदार्थ मिसळण्यात आल्याचा संशय तज्ज्ञांना आहे. डोकाडिया कुटुंबाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इतर खाद्य नमुन्यांमध्ये अद्याप कोणतीही भेसळ आढळली नाही, असंही FDA च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा मृतांच्या शरारीतले अवयव हिरवे पडले होते, अशी माहिती समोर आले होते. त्यामुळे फॉरेन्सिक अहवालानंतरच मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होणार आहे.
कलिंगडावर वळली संशयाची सुई
25 एप्रिल रोजी ही दुर्दैवी घटना घडली, तेव्हापासून सर्वांचा संशय हा कलिंगडावर होता. बिर्याणी खाल्ल्यानंतर त्यांनी कलिंगड खाल्ला होतं, त्यामुळे कलिंगडाच्या मार्फत विषबाधा झाला, असा संशय होता. मात्र FDAच्या प्राथमिक अहवालानुसार, कलिंगड पिकवण्यासाठी किंवा त्याला लाल रंग यावा यासाठी, कोणतंही रसायन वापरण्यात आलं नव्हतं. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये जी धक्कादायक माहिती समोर आल त्यानेखळबळ माजली. कारण चारही मृतांचे मेंद, आतडं आणि इतर अवयव हिरवट पडल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला होता.
त्यामुळे या कुटुंबाला कोणी विषबादा केली का, असा संशय अधिक बळावत आहे. पण कलिंगडामध्ये कोणतही रसायन वापरलं नसल्याचं एफडीएच्या अहवालातून स्पष्ट झालं होतं. मग डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू कसा झाला, त्यांची हत्या झाली की ती आत्महत्या होती, असा संशयही व्यक्त होत आहे.
आधी संशयाची सुई कलिंगडाच्या दिशेने वळली होती, त्यातून विषबाधा झाली असं सर्वांना वाटत होत. पण कलिंगडाला कृत्रिम रंग आणण्यासाठी कोणतंही रसायन वापरल नसल्याचं समोर आलं. त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जीव कशामुळे गेला, विषबाधा झाली होती का, कोणती गोष्ट कारणीभूत ठरली ते आता फॉरेन्सिक रिपोर्टचा अंतिम अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे. याप्रकरणातील संशय अधिक बळावत असून अंतिम अहवालाची सर्वांना प्रतिक्षा आहे.