26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

पोलीस बॉईज चेरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणं यंदाही शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. या निमित्ताने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांचा आणि कर्मचाऱ्यांचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांच्या हस्ते गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार
दिलीप वळसे-पाटलांच्या हस्ते मुंबई पोलिसांचा सत्कार

मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात (Mumbai Terrorist Attack) शहिद झालेल्या भारतमातेच्या सुपूत्रासं गेट वे ऑफ इंडिया (Gate way of India) येथे आदरांजली वाहण्यात आली. पोलीस बॉईज चेरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणं यंदाही शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. या निमित्ताने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांचा आणि कर्मचाऱ्यांचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांच्या हस्ते गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. मुंबईकरांच्या मदतीसाठी धावणाऱ्या पोलिसांचे मनोधर्य वाढवणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.

दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या मुंबईतील शहीद पोलिसांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्रध्दांजली वाहिली. या व्यतिरिक्त मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस फेम मेघा धाडे आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले याप्रसंगी उपस्थित होते.

मुंबईवर झालेल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्याला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भिती आणि कटू आठवणी अनेकांच्या मनात अद्यापही कायम आहेत. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक निरपराधी नागरिकांना प्राण गमवावा लागला होता. तर, मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या या वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पोलिसांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील- गृहमंत्री

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. या सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ आदरांजली अर्पण करतो. याशिवाय या हल्ल्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे. या माध्यमातून पोलिस बॉईज संघटनेतर्फे पोलिसांच्या काही समस्या असल्यास त्यांनी मांडाव्यात. गृहमंत्री असल्याने पालक म्हणून माझी काही जबाबदारी आहे. या उद्देशाने पोलिसांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याशिवाय पोलिस बांधव हा आपला मित्र आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी ते नेहमी स्वतः जीवाची आणि कुटूंबियांची पर्वा न करता सदैव तत्पर राहतात. त्यामुळे अशाप्रकारची दहशतवादी हल्ल्याची घटना पुन्हा घडणार नाही, यासाठी पोलिसांना सहकार्य करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.”

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून पोलिसांचा सत्कार

यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले म्हणाले की, ‘‘मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात लोकांच्या मनात अजूनही भिती कायम आहे. या हल्ल्यामध्ये पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र नसताना सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण केले. अनेकांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याशिवाय पोलिसांना त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून एक गुलाबाचे फूल देऊन गौरविण्यात आले आहे. 26/11 मधील वीरांना श्रद्धाजंली व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवा व पोलीस कर्मचाऱ्यांचा अडचणी कमी व्हाव्यात हा यामागील मुख्य उद्देश होता.’’

इतर बातम्या :

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : बिनविरोध निवड झाल्यानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया

‘नागपुरात चमत्कार घडणार नाही, काँग्रेसच्या अपेक्षा फोल ठरणार’, देवेंद्र फडणवीसांचा दावा

Published On - 5:50 pm, Fri, 26 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI