AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मिसिंग लिंकवरून वाहतूक कधी सुरू होणार? प्रशासनाने दिली सर्वात मोठी अपडेट

Missing Link : मिसिंग लिंक प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याच्या आधी अचानक दरड कोसळल्याने पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे. आता हा मार्ग कधी सुरु होणार याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! मिसिंग लिंकवरून वाहतूक कधी सुरू होणार? प्रशासनाने दिली सर्वात मोठी अपडेट
Mumbai Pune Missing LinkImage Credit source: Google
| Updated on: Jul 06, 2026 | 6:02 PM
Share

मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळित झाले आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक दरड कोसळल्यामुळे प्रभावित झाली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याच्या आधी अचानक दरड कोसळल्याने सध्या वाहतूक बंद आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. अशातच आता मिसिंग लिंकवरून वाहतूक कधी सुरू होणार? याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मिसिंग लिंकवरून वाहतूक कधी सुरू होणार?

मिसिंग लिंकवरील पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याचे समोर आल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी पोलिस, महामार्ग प्रशासन आणि बचाव पथक दाखल झाले. रस्त्यावर पडलेले दगड आणि माती हटवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. गेल्या अनेक तासांपासून हे दरड हटवण्याचे काम सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी घटनास्थळावर हजर असून त्यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. अशातच आता मिसिंग लिंक पुन्हा सुरू होण्यासाठी 5 ते 6 तासांचा वेळ लागणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या वेळत आणखी वाढही होण्याची शक्यता आहे.

वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन

मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे. तसेच सतत पाऊस सुरू असल्याने वाहनचालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. सध्या प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. वाहनचालकांना वारंवार योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच वाहन चालकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

वरंधा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

पुण्याहून कोकणाला जोडणाऱ्या भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट रस्त्यावर अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडीसोबत माती, झाडे झुडपांचा राडारोडा रस्त्यावर आल्याने संपूर्ण मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून आत्तापर्यंत 8 ते 9 ठिकाणची दरडी काढण्यात आली आहे. भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश माने पोलीस कर्मचाऱ्यांसह स्वतः उभं राहून दरडी हटविण्याचे काम करवून घेत आहेत. रात्री पासून अनेक ठिकाणी दरडी पडल्या असल्यानं अनेक वाहनं या घाटात अडकून पडली आहेत. पोलीस प्रशासनाकडून अडकलेल्या व्यक्तींची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?