पहिल्यांदाच नाही तर यापूर्वीही मुंबईत ओलीस ठेवल्याच्या घटना, बेस्टच्या बसपासून ते 14 वर्षीय मुलीला सीमा शुल्क अधिकाऱ्याने…

तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील पवई भागात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस थेट घटनास्थळी पोहोचले. 17 ही मुले सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांकडे मुलांना देण्यात आलंय.

पहिल्यांदाच नाही तर यापूर्वीही मुंबईत ओलीस ठेवल्याच्या घटना, बेस्टच्या बसपासून ते 14 वर्षीय मुलीला सीमा शुल्क अधिकाऱ्याने...
Mumbai Rohit Arya Ra Studios Case
| Updated on: Oct 31, 2025 | 12:01 PM

मुंबईच्या पवई भागात रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस थेट घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अत्यंत सावधगिरीने मुलांना सुखरूप बाहेर काढले. या व्यक्तीने मुलांना मारण्याची धमकी व्हिडीओमध्ये दिली होती. मुलांना वाचवत असलाना पोलिसांनी रोहित आर्याला गोळी मारली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी 17 मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती पुढे आल्यानंतर एकच मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. अनेकांनी पवईतील आरए स्टुडिओकडे धाव घेतली. पोलिसांनी बाथरूमची खिडकी काढून मुलांना वाचवण्यासाठी इमारतीमध्ये प्रवेश केला. पोलिसांकडून या प्रकरणातील तपास केला जातोय.

अशा प्रकारे लोकांना ओलीस ठेवण्याचा प्रकार मुंबईमध्ये पहिल्यांदा घडला नसून यापूर्वीही असा प्रकार घडलाय. 2010 मार्च महिन्यात अंधेरी भागात देखील अशीच एक घटना घडली होती. इमारतीच्या वादातून एका व्यक्तीने धक्कादायक असे पाऊल उचलले होते. एका फ्लॅटमध्ये 14 वर्षीय हिमानी नावाच्या मुलीला सेवानिवृत्त सीमा शुल्क अधिकारी हरीश मारोलिया यांनी ओलीस ठेवले होते. इमारतीचा वाद सुरू असताना हरीश मारोलिया यांनी हे पाऊल उचलले होते.

यादरम्यान हरीश मारोलिया या व्यक्तीने 14 वर्षीय मुलगी हिमानी हिची हत्या केली आणि पोलिसांपासून आपण वाचणार नाही हे लक्षात येताच त्याने स्वत: आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. नोव्हेंबर 2008 मध्ये बिहारमधून आलेल्या 25 वर्षीय राहुल राज याने अंधेरीहून निघालेल्या BEST च्या डबल-डेकर बसमधील प्रवाशांना टार्गेट केले. त्याने बसमधील प्रवाशांना ओलीस ठेवले.

बस कुर्ला येथील बैल मार्केट परिसरात पोहोचताच पोलिसांनी या बसला घेरले. पोलिसांनी यादरम्यान त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्याने तसे न करता एक चिठ्ठी बसमधून बाहेर फेकली आणि त्यात लिहिले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना जीवे मारायचे आहे. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. यापूर्वीही मुंबईमध्ये ओलीस ठेवण्याचे प्रकार घडली आहेत. मात्र, 17 लहान मुलांना ओलीस ठेवल्याने एकच खळबळ उडाली.