खळबळजनक घटना! मुंबईत वृद्ध महिलेवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला, अंगावर काटा आणणारा प्रसंग CCTVमध्ये कैद

मुंबईच्या अंधेरीत वृद्ध महिलेवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा अंगावर काटा आणणारा प्रसंग CCTVमध्ये कैद झाला आहे.

खळबळजनक घटना! मुंबईत वृद्ध महिलेवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला, अंगावर काटा आणणारा प्रसंग CCTVमध्ये कैद
dog bite news
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 18, 2026 | 8:22 AM

मुंबईसह संपूर्ण राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे शहरी भागात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांकडून सर्वसामान्यांवर जीवघेणे हल्ले सुरू आहेत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक चिमुकल्यांनी प्राण देखील गमावले आहेत. भारताची आर्थिक राजधानी मुंबईतही भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्यांना रस्त्यावरून चालणे अवघड झाल्याची प्रचिती एका व्हिडिओतून समोर आली आहे. दोन-तीन भटक्या कुत्र्यांनी शांतपणे चाललेल्या वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याचे उघड झालं आहे.

मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये भटक्या कुत्र्यांनी हिंसक हल्ला केल्याची घटना सीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्वेतील वास्तू कॉलनीतील वास्तू शिल्प बिल्डिंगमध्ये भटक्या कुत्र्यांनी हिंसक हल्ला केल्याचे समोर आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अंधेरीच्या पंप हाऊस परिसरातील मेघवाडी स्टेशनजवळ हा प्रकार घडला आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

एक वृद्ध महिला शांतपणे इमारतीमधील पायवाटेने चालली होती. तितक्यात काही भटक्या कुत्र्यांनी महिलेला घेरलं. त्यानंतर भटक्या कुत्र्यांनी महिलेवर भुंकण्यास सुरूवात केली. त्यामुळे महिलेने या कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी थेट महिलेवर हिंसक हल्ला करण्यास सुरुवात केली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुत्रा अचानक येऊन नागरिकांवर आणि लहान मुलांवर हल्ला करताना दिसत आहे. या हल्ल्यानंतर तातडीने इमारतीचा वॉचमेन घटनास्थळी पोहोचला. त्याने सर्व भटक्या कुत्र्यांना  हाकललं. या सीसीटीव्हीत कुत्रा अचानक येऊन रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर आणि मुलांवर झडप घालताना दिसत आहे. वाढत्या भटक्या कुत्र्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, याच इमारतीमधील वॉचमेन रामचंद्र भिवा शिंदे यांना अनेक भटक्या कुत्र्यांनी चावून जखमी केल होतं. त्यांनी त्यावेळी कुत्र्यांसापासून स्वत:चा कसाबसा बचाव केला होता. परंतु या घटनेनंतर एका स्थानिक नागरिकाने या वॉचमेनलाच मारहाण केली होती. या प्रकरणाची नोंद मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. या प्रकरणी FIR देखील नोंद  झाली होती. इमारतीत भटक्या कुत्र्यांनी कुरिअरवाले, फुड डिलिव्हरी, प्लंबर या सर्वांवर देखील हल्ले केले होते. या भटक्या कुत्र्यांमुळे सर्व छोटी मुले, वृद्ध नागरिाकांना धोका निर्माण झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us