AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर उद्धव ठाकरेंचं भाष्य; म्हणाले, आघाडीत बिघाडी…

Uddhav Thackeray on Mahavikas Aghadi Jagavatap : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा समोर आला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच राम मंदिराच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर उद्धव ठाकरेंचं भाष्य; म्हणाले, आघाडीत बिघाडी...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 30, 2023 | 2:50 PM
Share

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 30 डिसेंबर 2023 : लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच जागा वाटपातची चर्चा जोर धरू लागली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

जागावाटपावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 30 एप्रिलच्या आत लोकसभेच्या निवडणुका होतील. यांना कुणीतरी सांगितलं आहे की, 30 एप्रिलपर्यंत निकाल लागला तर तुमचं काहीतरी ठीक होईल. असं कुणीतरी सांगितल्याचं माझ्या कानावर आलं. आमच्या महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळित होईल. राष्ट्रवादी आणि आमची व्यवस्थित बोलणी सुरू आहे. जवळपास ही बोलणी झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

वंचित बाबत ठाकरे काय म्हणाले?

इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक झाली. तेव्हा काँग्रेसशी बोलणी झाली आहेत. मी स्वत: मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी बोललो आहे. पुढे काही दिवसात दिल्ली आमची पुन्हा बैठक होईल आणि आमचं सगळं सुरळित होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. वंचितबरोबर सुद्धा आमची बोलणी सुरु आहे. येत्या दोन दिवसात संजय राऊत- ठाकरे गटाचे दोन नेते आणि वंचितच्या नेत्यांमध्ये बोलणी होईल. एकत्र बैठक होईल, असंही ठाकरेंनी सांगितलं.

राम मंदिराच्या उद्घाटनावर ठाकरे काय म्हणाले?

राम मंदिराचं राजकारण होऊ नये. पण भाजपने राम मंदिराच्या उद्घाटनाचा इव्हेंट केला आहे. 22 जानेवारीलाच अयोध्येत दर्शनाला जायला हवं, असं काही नाही. राम मंदिर नव्हतं तेव्हा पूजा सुरूच होती. राम मंदिर नसतानाही आम्ही अयोध्येत गेलो. लाखो भाविकही अयोध्येत जात होते. माझ्या मनात येईल तेव्हा मी अयोध्येला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती