मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर
मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे आता पाणीसाठ्यात वाढ होत आहे, आता मुंबईला पाणी पुरवणारे जी धरणं आहेत त्यातील चार धरणं ही ओव्हरफ्लॉ झाली आहेत.

मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे . गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. बुधवार, दिनांक 22 जुलै 2026 सकाळी 6 ते गुरुवार, दिनांक 23 जुलै 2026 सकाळी 6 या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 69.74 % झाला आहे . गेल्या 24 तासात जलाशय साठ्यात 7.84 % वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अधिकृत अहवालानुसार, तलावांमध्ये सातत्याने पाणी जमा होत आहे. असंच पाणीसाठा जमा होत राहिला तर पाणीकपात लवकरच कमी होईल.
मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणी पुरवणारे मुख्य दोन तलाव जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच ओसंडून वाहत आहेत. विहार तलाव आणि तुळशी तलाव हे दोन्ही तलाव ओसांडून वाहत आहे. यासोबतच आणखी दोन धरणं ही दुथडी भर वाहत आहे. 18 जुलै 2026 ला सात तलावांमध्ये 7 लाख 34 हजार 891 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता तर तो 20 जुलै 2026 रोजी 7 लाख 82 हजार 370 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. आता 22 जुलै, 2026 पर्यंत, एकूण पाणीसाठ 8 लाख 35 हजार 919 दशलक्ष लिटर झाला आहे, जो एकूण साठवण क्षमतेच्या 57.75% आहे. आता आज 23 जुलै 2026 रोजी 10 लाख 09 हजार 432 दशलक्ष लिटर झाला आहे. इतका पाऊस पडूनही मागील वर्षीच्या तुलनेत 18 टक्के पाणीसाठा कमीच झाला आहे.