AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई झोनलच्या एनसीबी अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा!, नेमका प्रकार काय?

मुंबई झोनल ऑफिसचे एनसीबी अधिकारी दिनेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. महत्वाची बाब म्हणजे हा गुन्हा विनयभंगाचा आहे. रेल्वेमध्ये प्रवास करताना सहप्रवासी तरुणीचा विनयभंग केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई झोनलच्या एनसीबी अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा!, नेमका प्रकार काय?
मुंबईत तीन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 12:59 PM
Share

मुंबई : मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात नॉक्टोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यानंतर आता मुंबई झोनल ऑफिसचे एनसीबी अधिकारी दिनेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. महत्वाची बाब म्हणजे हा गुन्हा विनयभंगाचा आहे. रेल्वेमध्ये प्रवास करताना सहप्रवासी तरुणीचा विनयभंग केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी ही 25 वर्षाची असून ती हैदराबाद ते पुणे प्रवास करत होती. (NCB officer Dinesh Chavan charged with molestation by a young girl)

एनसीबी अधिकारी दिनेश चव्हाण हे कोर्टाच्या कामानिमित्त हैदराबादला गेले होते. कोर्टाचं काम आटोपून चव्हाण मुंबईच्या दिशेनं येत होते. त्यावेळी चव्हाण ज्या डब्यातून प्रवास करत होते, त्याच डब्यात तक्रारदार तरुणीही प्रवास करत होती. तक्रारदार तरुणी ही चव्हाण यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या आसनावर बसली होती. प्रवास सुरु असताना दिनेश चव्हाण यांनी तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकाराबाबत संबंधित तरुणीने टीसीकडे तक्रार केली.

तरुणीकडून परळी रेल्वे पोलिसांकडे तक्रार

त्यानंतर तरुणीने बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे पोलीस ठाण्यात एनसीबी अधिकारी दिनेश चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली आहे. दिनेश चव्हाण हे एनसीबीचे मुंबई झोनलचे अधिकारी आहे. ते नवी मुंबईतील कोपरखैरने परिसरात वास्तव्याला असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, एका एनसीबी अधिकाऱ्यावर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

वानखेडेंनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला

क्रूझवरील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर एनसीबीचं देशभरातून कौतुक होत असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या कारवाईबाबतचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं. त्यानंतर आज वानखेडे यांनी पत्रकारांचा व्हॉट्सअ‍ॅपग्रुपच सोडला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

समीर वानखेडे हे काही मोजक्या पत्रकारांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आहेत. पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी मलिक यांच्या या आरोपावरून वानखेडे यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून रिअ‍ॅक्शन विचारण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांच्या प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्याने वानखेडे यांनी अखेर या ग्रुपमध्येच बाहेर पडणं पसंत केलं. मलिक यांनी वानखेडे आणि त्यांच्या टीमवर केलेल्या आरोपानंतर वानखेडे हे चिडचिडे झाल्यानेच त्यांनी ग्रुप सोडल्याचं सांगितलं जात आहे. मलिक यांच्या आरोपांवर एनसीबीने व्यवस्थित उत्तर न दिल्यानेच वानखेडे हे घेऱ्यात आले असल्याचंही सांगितलं जात आहे. पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनीही वानखेडे यांनी पत्रकारांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडल्याचं ट्विट केलं आहे.

इतर बातम्या :

VIDEO: दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही; सुप्रिया सुळेंनी ठणकावले

महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं, शरद पवारांची हाक

NCB officer Dinesh Chavan charged with molestation by a young girl

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.