लोकलच्या प्रवासात प्रवाशांच्या मृत्यूचे चक्र सुरुच, मध्य रेल्वेचे या स्थानकांवर ईएमआर सुविधेसाठी टेंडर

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मेडिकल इमर्जन्सी रुमची स्थापना करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकात ईएमआर सुविधा केंद्राचे टेंडर संपले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात सापडले आहेत.

लोकलच्या प्रवासात प्रवाशांच्या मृत्यूचे चक्र सुरुच, मध्य रेल्वेचे या स्थानकांवर ईएमआर सुविधेसाठी टेंडर
CR tenders for EMR facilities at stations
| Updated on: Feb 23, 2026 | 5:18 PM

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या धकाधकीच्या प्रवासात प्रवाशांचा लोकलमधून पडून आणि रेल्वेचे रुळ ओलांडतानाचे मृत्यूसत्र सुरुच आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेचा अनेक वर्षे रखडलेला महत्वाचा पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प आणि लोकल प्रवाशांच्या संख्येनुसार लोकल फेऱ्यात वाढ न झाल्याने अजूनही प्रवासी लोकलमधून पडून मरण पावत आहेत. तर रेल्वे रुळ ओलांडतानाही अनेक प्रवाशांचे मृ्त्यू झाले आहेत. साल २०२५ मध्ये मध्य आणि पश्चिम मार्गावर मिळून एकूण ४,८४१ जण जखमी आणि मृत्यूमुखी पावले आहेत. मुंबई उपनगरीय लोकलमधून १,७१३ प्रवासी पडले त्यात १,१८८ प्रवासी जखमी झाले तर ५२५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर उपनगरीय मार्गावर रेल्वे रुळ ओलांडण्याच्या १,२९८ केस झाल्या त्यात १,०६३ प्रवाशांचा मृत्यू तर २३५ प्रवासी जखमी झाले. हा हानीचा आकडा कमी करता आला असता असे सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांचे म्हणणे आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा