AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 6 वर्षात 3323 इमारत दुर्घटना, 249 जणांचा मृत्यू, 919 जण जखमी

गेल्या 6 वर्षात मुंबईत तब्बल 3 हजार 323 इमारतींचे भाग कोसळले आहेत. यात 249 लोकांचा मृत्यू झाला असून 919 जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिली आहे.

मुंबईत 6 वर्षात 3323 इमारत दुर्घटना, 249 जणांचा मृत्यू, 919 जण जखमी
| Updated on: Jun 29, 2019 | 6:25 PM
Share

मुंबई : पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 मजुर तर तीन मुलांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या 6 वर्षात मुंबईत तब्बल 3 हजार 323 इमारतींचे भाग कोसळले आहेत. यात 249 लोकांचा मृत्यू झाला असून 919 जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला 2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या, त्यात किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती लोक जखमी झाले याबाबत माहिती विचारली होती. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे जनसंपर्क अधिकारी आणि सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी माहिती अधिकारी अधिनियम 2005 कायद्यान्वे ही माहिती दिली आहे.

या माहितीनुसार 2013 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 3 हजार 323 घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळल्याच्या घटना घडल्या आहे. यात एकूण 249 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 919 लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.

मुंबईत 2013 मध्ये एकूण 531 घर, घरांचे भाग, भिंती, इमारती किंवा इमारतींचे भाग कोसळल्याची घटना घडली आहे. यात एकूण 101 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 58 पुरुष आणि 43 स्त्रियांचा समावेश आहे. तर 183 लोक जखमी झाले असून त्यात 110 पुरुष आणि 73 स्त्रियांचा समावेश आहे.

त्यानंतर 2014 मध्ये एकूण 343 घर, घरांचे भाग,  भिंती, इमारती,  इमारतींचे भाग कोसळणची घटना आहेत. एकूण 21 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 17 पुरुष आणि 4 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 100 लोक जखमी झाले असून त्यात 62 पुरुष आणि 38 स्त्रियांचे समावेश आहे.

तसेच 2015 मध्ये एकूण 417 घर , घरांचे भाग, भिंती, इमारती,  इमारतींचे भाग कोसळण्याची घटना घडली आहे. यात एकूण 15 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 11 पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे. तर 120 लोक जखमी झाले असून त्यात 79 पुरुष आणि 41 स्त्रियांचा समावेश आहे.

2016 मध्ये एकूण 486  घर , घरांचे भाग ,  भिंती , इमारती ,  इमारतींचे भाग कोसळणची घटना आहेत. व एकूण 24 लोकांचा  मृत्यू झाला असून त्यात 17 पुरुष आणि 7 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 172 लोक जखमी झाले असून त्यात 113 पुरुष आणि 59 स्त्रियांचे समावेश आहे.

त्याशिवाय 2017 मध्ये 568  घर, घरांचे भाग,  भिंती, इमारती,  इमारतींचे भाग कोसळण्याची घटना घडली आहे. यात एकूण 66 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 44 पुरुष आणि 22 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकूण 165 लोक जखमी झाले असून त्यात 101 पुरुष आणि 64 स्त्रियांचा समावेश आहे.

तर गेल्यावर्षी म्हणजेच 2018 मध्ये एकूण 619 घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळल्याची घटना घडली आहे. त्यात 15 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 12 पुरुष आणि 3 स्त्रियांचा समावेश आहे. तर या दुर्घटनेत एकूण 79 लोक जखमी झाले असून त्यात 60 पुरुष आणि 19 स्त्रियांचा समावेश आहे.

दरम्यान सर्व जास्त घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळल्याच्या दुर्घटना अवैध बांधकाम कारणामुळे होतात. दर महिन्याला मुंबईत जवळपास 1 हजार अनधिकृत बांधकाम उभी राहतात. मात्र मुंबई महानगरपालिका या अनधिकृत बांधकामांवर दाखवण्यापुरती फक्त जुजबी कारवाई करते. त्यामुळे पुण्यासारख्या दुर्घटना मुंबईतही घडू शकतात, असे मत आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी व्यक्त केलं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.