
लग्न म्हटलं की तरुण-तरुणींचा उत्साह गगनात मावेनासा होता. लग्नात काय करायचे, कोणते कपडे घालायचे, कोणाला बोलवायचे, पत्रिका कशा छापायाच्या आणि इतर बराच गोष्टींचा उत्साह पाहायला मिळतो. पण कधीकधी उतावळेपणामुळे देखील मोठे नुकसान होते असे म्हटले जाते ते काही चुकीचे नाही. तसेच काहीसे पालघरमधील एका तरुणासोबत घडले आहे. त्याने होणाऱ्या पत्नीकडे अशी काही मागणी केली की ती सतत नकार देत होती. पण आता त्याला आयुष्यभर या गोष्टींचा पश्चाताप होणार आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…
पीडितेच्या आईने केली तक्रार
महाराष्ट्रातील पालघर येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणाने लग्न ठरल्यानंतर लगेचच होणाऱ्या पत्नीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती. त्याने लग्नाआधीच बलात्कार करुन तिची हत्या केली. पीडितेच्या आईचा आरोप आहे की हत्या करण्यापूर्वी आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना तेव्हा घडली जेव्हा पीडितेच्या घरी कोणीही नव्हते. पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर काही तासातच आरोपीला बेड्या घालण्यात आल्या. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.
वाचा: महिलांचे पाय कापून ठेवायचा, स्तन काढून… क्रूर ‘लस्ट किलर’ची कथा, हिल्सचा होता वेडा!
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावातील एका युवतीचे लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हे लग्न होणार होते. घटनेच्या दिवशी पीडित मुलीचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. त्या वेळी ती घरी एकटीच होती. तिचा होणारा नवरा तिथे आला आणि त्याने तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पण तिने स्पष्टपणे नकार दिला.
आरोपीने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. पण मुलीने सांगितले की, ती लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणार नाही. यानंतर आरोपी संतापला. रागाच्या भरात त्याने तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने तिचा गळा दाबून तिची हत्या केली.
आरोपीला पोलिसांनी केली अटक
या घटनेनंतर आरोपी गावाजवळील जंगलात पळून गेला. संध्याकाळी जेव्हा मुलीचे कुटुंबीय घरी परतले, तेव्हा त्यांना मुलगी मृतावस्थेत आढळली. मुलीच्या आईने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली. मुलीच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे आणि पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.