Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावीत गॅस सिलींडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठी आग, एकामागून एक स्फोट,घबराट पसरली

धारावी बस डेपोजवळ गॅस सिलींडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे.त्यामुळे या परिसरात घबराट पसरली आहे. या आगीचे नेमके कारण समजलेले नाही.

धारावीत गॅस सिलींडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठी आग, एकामागून एक स्फोट,घबराट पसरली
Follow us
| Updated on: Mar 24, 2025 | 10:57 PM

धारावी परिसरातीत गॅस सिलींडर वाहून नेणाऱ्या ट्रकला मोठी आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. धारावी बस डेपोच्या जवळच ही आग लागल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. सिलींडरचा स्फोट एकामागून एक स्फोट होत असल्याने घबराट पसरले आहे. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या घटनेत अद्यापर्यंत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. या घटनेत ५ ते १०  दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

 बाबूराव माने काय म्हणाले ?

धारावी नेचर पार्क जवळ या सिलींडर भरुन नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याचे स्थानिक आमदार बाबूराव माने यांनी सांगितले. आतापर्यंत १२ सिलींडरचा स्फोट झाल्याचे ते म्हणाले. या परिसरातील नागरिकांना मैदानात हलविण्यात आला आहे. या दुर्घटनेत मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईकऱ्यांच्या जीवाशी खेळ

या परिसरात धारावीत नो पार्किंग झोन असतानाही धोकादायकरित्या गॅस सिलींडर भरलेल्या गाड्या पार्क करणे बेजबाबदारीचे लक्षण आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी अशा प्रकारचे धोकादायक ट्रक येथे नेहमीच येथे पार्क केले जातात. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाशी हा खेळ सुरु आहे. पालिकेचे एवढे मोठे बजेट काय कामाचे असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. या सिलींडरच्या स्फोटाने संपूर्ण धारावी परिसरात घबराट पसरली आहे. या स्फोटात अजूनही कोणी जखमी झाले की नाही याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

 जवळ जाण्याचे टाळा,३० हून अधिक सिलींडर

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. येथे नेहमीच कचऱ्याच्या गाड्या आणि सिलींडरच्या गाड्या बेकायदेशीरित्या पार्क करुन ठेवण्यात आल्या आहेत. या संदर्भात खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील तक्रारी केल्या आहेत. तीन वर्षे झाले पालिकेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. या ठिकाणी ट्रकमध्ये ३० हून अधिक सिलींडर या ट्रकमध्ये असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या गाड्यांच्या स्फोटांचे आवाज अनेक किलोमीटर परिसरात ऐकू येत असल्याने जवळ जाण्याचे टाळा अशी मागणी स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांनी म्हटले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.