मजुरांना अन्न-पाणी नको, घरी जायची सोय हवी, आदित्य ठाकरेंचं मोदी सरकारकडे बोट

| Updated on: Apr 14, 2020 | 7:09 PM

वांद्रे स्थानकातील सध्याची परिस्थिती किंवा सूरतमधील दंगल ही केंद्र सरकार स्थलांतरित कामगारांसाठी घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्याचा परिणाम आहे

मजुरांना अन्न-पाणी नको, घरी जायची सोय हवी, आदित्य ठाकरेंचं मोदी सरकारकडे बोट
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी (Aaditya Thackeray On Bandra Labors) सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवली. मात्र, मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. नागरिकांकडून आपल्या मूळ गावाकडे परत जाण्यासाठी रेल्वे सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सध्याची राज्याची परिस्थिती पाहता वांद्र्यात झालेली ही गर्दी धोकादायक आहे. मात्र, वांद्रे स्थानकातील सध्याची परिस्थिती किंवा सूरतमधील दंगल ही केंद्र सरकार स्थलांतरित कामगारांसाठी घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्याचा परिणाम आहे, अशी टीका राज्याचे पर्यटन मंत्री (Aaditya Thackeray On Bandra Labors) आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत वांद्र्यातील परिस्थितीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.

वांद्रे स्थानकातील सध्याची परिस्थिती किंवा सूरतमधील दंगल यासाठी केंद्र सरकार जबाबदार, स्थलांतरित कामगारांना अन्न-पाणी किंवा निवारा नको, त्यांना घरी परतायचं आहे, कामगारांची घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास केंद्र सरकार सक्षम नसल्याचा हा परिणाम आहे. “, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं.

“लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून रेल्वे बंद आहेत. मात्र, स्थलांतरित कर्मचारी घरी पोहोचावेत यासाठी, राज्य सरकारने केंद्राकडे आणखी 24 तास रेल्वे चालू ठेवण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. स्थलांतरित कर्मचाऱ्यांसाठी योजना आखण्याची विनंती केली होती”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. (Aaditya Thackeray On Bandra Labors)

“केंद्र सरकारने एक रस्ता निश्चित करुन द्यावा, ज्यामाध्यमातून परप्रांतीय कामगार एका राज्यातून दुसर्‍या राज्यात सुरक्षित आणि कार्यक्षमतेने पोहोचू शकतील. हा मुद्दा केंद्राकडे वारंवार उपस्थित केला जात आहे”, असा उल्लेखही आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला.

तसचे, “सुरत, गुजरातमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता, तिथेही अशीच परिस्थिती आहे आणि कामगारांकडून येणाऱ्या प्रतिक्रियाही सारख्या आहेत. अनेक कामगारांनी खाण्यास आणि राहण्यास नकार दिला आहे. सध्या महाराष्ट्रात 6 लाखापेक्षा अधिक स्थलांतरित लोक वेगवेगळ्या छावण्यांमध्ये आहेत”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

स्थलांतरित मजुरांना जेवण किंवा राहण्याची सोय नको, त्यांना घरी जायचं आहे. केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाची सोय केली नाही. त्याचा परिणाम म्हणजे वांद्रेत उसळलेली गर्दी किंवा सुरतमधील दंगलसदृश्य स्थिती आहे.

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून रेल्वे बंद आहेत. मात्र स्थलांतरित कर्मचारी घरी पोहोचावेत यासाठी, राज्य सरकारने केंद्राकडे आणखी 24 तास रेल्वे चालू ठेवण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. स्थलांतरित कर्मचाऱ्यांसाठी योजना आखण्याची विनंती केली होती.

केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने स्थलांतरितांना त्यांच्या मूळ गावी घरी जाण्याबाबत नियोजन केलं जात आहे. त्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सुरक्षितपणे जाता यावं यासाठी प्रयत्न केला जात आहे. आम्ही वारंवार केंद्राकडे यासाठी पाठपुरावा करत आहोत.

गुजरातमधील सुरतसारखीच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे. स्थलांतरित मजुरांच्या प्रतिक्रियाही सारख्याच आहेत. अनेकांना राहणं-खाणं नको तर घरी जायचं आहे. सध्या महाराष्ट्रात सहा लाखांपेक्षा अधिक स्थलांतरित लोक वेगवेगळ्या छावण्यांमध्ये आहेत.

वांद्र्यात काय घडलं?

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. मात्र, मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली आहे. नागरिकांकडून आपल्या मूळ गावाकडे परत जाण्यासाठी रेल्वेगाडीची मागणी केली. त्यामुळे वांद्रेमध्ये भागात बस डेपोजवळ जमा झालेल्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे वांद्रे येथील परिस्थिती चिघळल्याचं दिसत आहे.

वांद्रा येथे हजारोच्या संख्येने जमा झालेले कामगार जवळच्याच वस्तीमध्ये राहत होते, अशी माहिती मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून ते येथेच राहत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे प्रचंड गैरसोय आणि हालअपेष्ट होत असल्याची संबंधित कामगारांची तक्रा आहे. हे टाळण्यासाठीच ते त्यांच्या मूळगावी जाण्याचा हट्ट करत आहेत. त्यासाठीच ते बस डेपो परिसरात जमा झाले. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं आहे.

Aaditya Thackeray On Bandra Labors

संबंधित बातम्या :

लॉकडाऊन वाढीला विरोध, गावी जाण्याच्या हट्टापायी वांद्रे येथे हजारोंची गर्दी

‘कुचाळक्या थांबवा, चाचण्या वाढवा’, जितेंद्र आव्हाडांचं खरमरीत पत्र

Photo : लॉकडाऊन उद्ध्वस्त, वांद्र्यात धडकी भरवणारी गर्दी

कोरोनाचा कहर, नागपूरमध्ये कोरोनाचे आणखी 2 नवे रुग्ण, 12 तासात 9 नवे कोरोनाबाधित रुग्ण