AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray | खोके सरकार कॉन्ट्रॅक्टरबरोबर सेटलमेंट करणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल

Aaditya Thackeray | ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईच्या रस्त्यांच्या विषयावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर घणाघाती टीका केली. कामांना कधी मंजुरी दिलेली आणि ती काम अजून कशी सुरु झालेली नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मुंबईत किती हजार कोटींची काम पडून आहेत, यावर त्यांनी भाष्य केलं.

Aaditya Thackeray | खोके सरकार कॉन्ट्रॅक्टरबरोबर सेटलमेंट करणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल
aaditya thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2023 | 3:38 PM
Share

मुंबई : “ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत. महापौर, लोकप्रतिनिधी, नगसेवक नाहीत, तिथे घोटाळा सुरु आहे. तोच मी समोर आणला. रस्त्यांच्या विषयात केवळ घोटाळाच आहे. खोके सरकारने दुसरं काही केलेलं नाहीय” असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय. “पाच कॉन्ट्रॅक्टर्सना पॅकेट कॉन्ट्रॅक्ट दिलेत. CMO त कोणाला पाकिट दिली माहिती नाही. या सगळ्या पॅकेट कॉन्ट्रॅक्टर्सपैकी एकाला टर्मिनेशनची नोटीस आली होती. त्याची मुदत 26 ऑक्टोबरला संपली” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “या कॉन्ट्रॅक्टरने टर्मिनेशन नोटीसला उत्तर दिलय. आठवड्याभरात त्याची BMC मध्ये सुनावणी होईल. मुंबई महापालिकेत सुनावणी होणार आहे, विधानभवनात हा विषय चर्चेत आलेला. चौकशीत काय होणार? यावर आमच लक्ष आहे. याच आठवड्यात सुनावणी घेणार का? खोके सरकार कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेट करुन ब्लॅकलिस्ट करणार की, सेटलमेंट करणार?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

“दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला 1000 कोटीची काम दिली. त्या कॉन्ट्रॅक्टरचा चिपळूनमधला पूल पडला. त्याची चौकशी झाली का? त्याच्यावर काही कारवाई होणार असेल तर मुंबईच्या कामाच काय? हा प्रश्न उपस्थित होतो” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “मुंबईत रस्त्यांची काम 1 ऑक्टोबर ते 31 मे या कालावधीत होतात. 2021-22 मध्ये अडीच हजार कोटींची काम मंजूर केलेली. 24 ते 36 महिन्यात एकातरी कामाला सुरुवात झाली आहे का? अडीच हजार कोटींची काम अशीच पडून आहेत. 21-22 ची अजून सुरु झालेली नाहीत” याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधलं. मुंबईत किती हजार कोटींची काम पडून ?

“खोके सरकारमध्ये कंत्राटदाराचे लाड चालेल आहेत. बाकी काही नाही. मुंबईत साडेआठ हजार कोटींची काम अशीच्या अशी पडलेली आहेत. वाहतूक पोलिसांच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत किंवा परवानगी देऊ नका असं सांगितलेलं आहे, 31 मे पर्यंत कुठली काम पूर्ण होणार आहेत?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?