VIDEO | महिला वर्षभर ‘लिव्ह इन’मध्ये राहतात आणि नंतर सांगतात बलात्कार झाला : अबू आझमी

| Updated on: Feb 17, 2021 | 9:10 AM

अशा गोष्टींची तक्रार झाल्यानंतर पुरुषाचं नाव मीडियात अजिबात येता कामा नये" अशी मागणी अबू आझमी यांनी केली. (Abu Azami Live in relationship)

VIDEO | महिला वर्षभर लिव्ह इनमध्ये राहतात आणि नंतर सांगतात बलात्कार झाला : अबू आझमी
Follow us on

भिवंडी : महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (Live in relationship) वर्षभर एकत्र राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, अशा शब्दात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azami) यांनी ताशेरे ओढले. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Maharashtra Minister Sanjay Rathod) यांची पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) चौकशी होणे गरजेचे आहे. त्यापूर्वीच त्यांना दोषी ठरवणे चुकीचे असल्याचेही आझमी यांनी सांगितले. (Abu Azami criticizes Live in relationship)

“व्हॉट इज धीस लिव्ह इन रिलेशनशीप?”

“देशात कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशन… व्हॉट इज धीस लिव्ह इन रिलेशनशीप? तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता, कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितलं माझा बलात्कार झाला” अशा शब्दात अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला.

“एखाद्या महिलेने तक्रार केली, तर पुरुष जिवंतपणी मेलाच”

“इस्लामी कायदा आहे. एखाद्या महिलेचं जर लग्न झालं नसेल, तर पतीसोबत जे कृत्य करता येतं, ते ती कुठल्याही परपुरुषासोबत करु शकत नाही. कुठल्याही महिलेने परपुरुषासोबत राहू नये, हा इस्लामी कायदा आहे. खरं तर प्रत्येक धर्मात हेच आहे. मात्र आज आधुनिक काळात पाश्चात्य वारे वाहू लागल्याने लोक वाहवत जात आहेत. याचा फायदा उचलून लोक गैरफायदा घेताना दिसत आहेत. त्यामुळे चौकशी व्हायला पाहिजे. एखाद्या महिलेने तक्रार केली, तर पुरुष जिवंतपणी मेलाच. मात्र सत्य काय आहे ते चौकशीअंतीच बाहेर येतं.” याकडे अबू आझमींनी लक्ष वेधलं. (Abu Azami criticizes Live in relationship)

“तक्रारीनंतर लगेच पुरुषाचं नाव मीडियात नको”

“मी एकदा यूपीला गेलो होतो. तिथे एक महिला भरदुपारी डोक्यावर शेण घेऊन चालली होती, तरी तिने डोक्यावर पूर्ण पदर घेतला होता, ही आपली संस्कृती आहे. पडद्याशिवाय राहिलात, पुरुषांमध्ये फिरलात, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलात, तर अशा गोष्टी होण्याची शक्यता वाढते. अशा गोष्टींची तक्रार झाल्यानंतर पुरुषाचं नाव मीडियात अजिबात येता कामा नये” अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

संबंधित बातम्या :

…तर प्रवाशांना त्यांच्या खर्चाने क्वारंटाईन करुन काय साधणार?, अबू आझमींचे उद्धव ठाकरेंना पत्र

कोण राज ठाकरे? आता शिवसेना राज्यात नव्हे, देशात वाढणार : अबू आझमी

(Abu Azami criticizes Live in relationship)