AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी नशिबवान की बाबा माझ्या लहानपणीच गेले, कारण..; सखी गोखले असं का म्हणाली?

Actress Sakhi Gokhle on his Parent Mohan Gokhale and Shubhangi Gokhale : अभिनेत्री सखी गोखले हिने तिच्या बाबांच्या निधनावर भाष्य केलं. एका मुलाखतीदरम्यान सखीने यावर भाष्य केलं आहे. तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. सखी गोखले नेमकं काय म्हणाली? वाचा सविस्तर...

मी नशिबवान की बाबा माझ्या लहानपणीच गेले, कारण..; सखी गोखले असं का म्हणाली?
| Updated on: May 13, 2024 | 1:56 PM
Share

अभिनेत्री सखी गोखले हिने तिचे बाबा दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्या निधनावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. बाबा लवकर गेल्याने तिच्याकडे बाबासोबतच्या आठवणी नसल्याचं ती म्हणाली आहे. मी प्रचंड लकी आहे की, मी खूप लहान असताना माझा बाबा गेला. तेव्हा इतकी लहान होते की, तेव्हाचं मला फारसं काही आठवतही नाही. आपण जसजसे मोठे होतो. तसं तसं आपल्याला गोष्टी कळायला लागतात. आपल्या आठवणी तयार व्हायला लागतात. पण मी लहान असताना बाबा गेल्यामुळे त्याच्यासोबतच्या स्ट्राँग आठवणी माझ्याकडे नाहीत. आई जवळची की बाबा हे कळायचं सुद्धा माझं वय नव्हतं…, असं सखी गोखले म्हणाली.

सखी गोखले बाबांच्या निधनाबाबत काय म्हणाली?

बाबा गेला तेव्हा मी केवळ सहा वर्षांची होते. त्या काळात बाबा प्रचंड काम करत होता. तो सतत कामात बिझी असायचा. त्यामुळे तेव्हा आई माझ्याजवळ होती. मला आईचीच सवय होती. त्यामुळे माझ्यासाठी बाबाचं जाणं तितकंस कठीण नव्हतं. आई-बाबांना गमावणं त्या मुलांसाठी कठीण आहे. जे कळत्या वयात आपल्या पालकांना गमाववात. त्यांच्यकडे पालकांसोबतच्या आठवणी असतात. त्यामुळे त्यांना यातून सावरणं कठीण असतं, असं सखी म्हणाली.

आईच्या मित्र-मैत्रिणींनी मला प्रेम दिलं- सखी

मी स्वत:ला फार लकी समजते की बाबा गेला तेव्हा माझा मेंदू तितकासा डेव्हलप झालेला नव्हता. त्यामुळे मला मनापासून वाटतं की हे चांगलं झालं की, मी लहान होते, असंही सखी पुढे म्हणाली. पण जरी बाबा नसला तरी माझ्या आजूबाजूचे लोक होते. त्यांनी मला सांभाळलं. मला प्रेम दिलं. माझे आजोबा, माझे नातेवाईक सोबत होते. आईचे मित्रमैत्रिणी त्यांनी मला प्रेम दिलं. तिच्या मैत्रिणींनी मला बाबांच प्रेम दिलं. त्यांनी माझ्यावर संस्कार केले, असं सखीने सांगितलं.

आईमधला एक गुण माझ्यातही आहे. तो म्हणजे माझे मित्रमैत्रिणी खूप आहेत. माझं सर्कल खूप चांगलं आहे. खूप चांगली लोकं आमच्याशी जोडली गेलेली आहेत, असंही सखी गोखले म्हणाली.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.