AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samruddhi Highway Project : प्रकल्प कालावधी आधी पॅकेजचे काम पूर्ण करणारी अ‍ॅफकॉन्स पहिली कंपनी, ‘समृद्धी’चे काम किती पूर्ण?

Samruddhi Highway Project : आम्ही प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भू कामासाठी एक उत्कृष्ट टीम तयार केली होती. तसेच, भारतातील सर्वात मोठा वन्यजीव उन्नत मार्ग बांधला.

Samruddhi Highway Project : प्रकल्प कालावधी आधी पॅकेजचे काम पूर्ण करणारी अ‍ॅफकॉन्स पहिली कंपनी, 'समृद्धी'चे काम किती पूर्ण?
प्रकल्प कालावधी आधी पॅकेजचे काम पूर्ण करणारी अ‍ॅफकॉन्स पहिली कंपनीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2022 | 4:44 PM
Share

मुंबई: नागपूर व मुंबईला (mumbai) जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 701 किमीचा आहे. हा महामार्ग 24 जिल्ह्यातून जात असून तो 16 पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे. त्यातील, वर्धा येथे पॅकेज- 2 आणि इगतपुरी येथे पॅकेज- 14 या दोन पॅकेजवर अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (afcons infrastructure limited) काम केले आहे. पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) पूर्ण करणारी तसेच समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway Project) प्रकल्प कालावधी आधी पॅकेज 2 चे काम पूर्ण करणारी अ‍ॅफकॉन्स ही पहिली कंपंनी ठरली आहे. तसेच, पॅकेज-14 मध्ये इगतपुरी येथील दुहेरी बोगदे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले आहेत. असंख्य आव्हाने आणि कोविड-19 साथीच्या आजारानंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीतसुद्धा हे टप्पे गाठले. त्यामुळे अॅफकॉन्स लिमिटेडचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असून या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला वेगाने चालना मिळणार आहे.

वर्धा येथील खडकी आमगाव ते पिंपळगाव या 58.4 किमी या पॅकेज 2 चे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या पट्ट्यात 10 दशलक्ष क्यूबिक मीटर ओपन टेकडी कटिंग, दोन वन्यजीव उन्नत मार्ग, एक रोटरी आणि दोन इंटरचेंज, 18 दशलक्ष क्यूबिक मीटर मातीकाम, छोटे आणि मोठे पूल आणि असंख्य स्टील स्ट्रक्चर्सची उभारणी या कामांचा समावेश पॅकेज दोन मध्ये आहे.

महामारीतही चांगलं काम

अ‍ॅफकॉन्स चे पॅकेज 2 चे प्रकल्प नियंत्रक कृष्णमूर्ती यांनी पॅकेज 2 मधील बांधकामे ही अभियांत्रिकी आव्हाने दर्शवित असल्याचे सांगितले. आम्हाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या चांगल्या पाठिंब्यामुळे कोविड महामारी असतानाही चांगले काम करता आले. कामाच्या अंमलबजावणीची गती वाढवता आली, असे कृष्णमूर्ती यांनी सांगितले.

प्राण्यांचीही काळजी घेतली

आम्ही प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भू कामासाठी एक उत्कृष्ट टीम तयार केली होती. तसेच, भारतातील सर्वात मोठा वन्यजीव उन्नत मार्ग बांधला. बांधकामादरम्यान कोणत्याही प्राण्याला इजा होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. कारण यामध्ये ड्रिलिंग आणि ब्लास्टिंगचा समावेश होता. आम्ही दोन्ही बाजू बॅरिकेड केल्या आणि सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेतली, असे अ‍ॅफकॉन्स चे पॅकेज-2 चे प्रकल्प व्यवस्थापक अभिजीत चक्रवर्ती यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्ग पॅकेज – 2 ची वैशिष्ट्ये

  1. खडकी आमगाव ते वर्धा जिल्ह्यातील पिंपळगाव पर्यंत 58.4 किमी विस्तार
  2. प्रकल्प कालावधी आधी पूर्ण होणारे समृद्धी महामार्गाचे पहिले पॅकेज
  3. 150 किलोमीटर प्रती तास गती ( डिझाईन स्पीड)
  4. 200 पेक्षा जास्त बांधकामे
  5. 53 बॉक्स कल्व्हर्ट, 25 लहान पूल, 19 वाहनासाठी भुयारी मार्ग, 12 पादचारी भूमिगत मार्ग, 11 फ्लायओव्हर, 5 मोठे पूल, 2 रेल्वे ओव्हर ब्रिज, 2 वन्यजीव उन्नतमार्ग, 2 वन्यजीव भूमिगत मार्ग
  6. समृद्धी महामार्गामधील सर्वात रुंद आणि देशातील पहिला वन्यजीव उन्नत मार्ग
  7. 12 किमी ओपन हिल कटिंग
  8. 18 दशलक्ष क्युबिक मीटरचे एकूण मातीकाम
  9. वर्धा नदीवरील 315 मीटर लांबीचा प्रमुख पूल 14 महिन्यांत पूर्ण
  10. वर्धा नदीवर स्टीलचा वापर करून बो स्ट्रिंग ब्रीज बांधला.

Follow Us
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.