राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी समृद्धी महामार्गाचे काम 74 टक्के पूर्ण; एकनाथ शिंदेंकडून पाहणी

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम जवळपास 74 टक्के पूर्ण झालं आहे.

राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी समृद्धी महामार्गाचे काम 74 टक्के पूर्ण; एकनाथ शिंदेंकडून पाहणी
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

नागपूर : देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे त्यासोबतच राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम जवळपास 74 टक्के पूर्ण झालं आहे. या समृद्धी महामार्गाची आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत. सध्या या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरचा असा पल्ला असणाऱ्या महामार्गाचे काम 16 टप्प्यात पूर्ण होत आहे. या प्रकल्पासाठी साधारण 55 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात येणार आहे. (Maharashtra Samruddhi Mahamarg 74 per cent wok completed : Eknath Shinde)

एकनाथ शिंदेंकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

काही महिन्यांपूर्वी नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यात आले. यानंतर आता हा प्रकल्पाची सद्यस्थिती काय? याची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी 26 हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत. तर 7 हजार कोटी जमीन खरेदीसाठी आणि उर्वरित रक्कम विविध कामासाठी असणार आहे.

महामार्गाच्या दुतर्फा 11 लाख झाडांची उभारणी

या प्रकल्पाचे बांधकाम एकूण 16 टप्प्यात होणार आहे. त्यातील 14 टक्के काम हे अंतिम टप्प्यात आलं आहे. या महामार्गाच्या बांधकामासाठी एकूण 13 कंपन्याचे कंत्राटदार काम करत आहेत. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर दुतर्फा जवळपास 11 लाख झाडे लावण्यात येणार आहेत.

सुरुवातीला आणि शेवटी एक टोलनाका

या महामार्गाच्या आजूबाजूला खोदकाम केल्यानंतर 191 तळी बांधण्यात आलेली आहेत. त्यांचा वापर त्या त्या जमिनीतील शेतकऱ्यांना भविष्यात होणार आहे. तसेच महामार्गाच्या सुरुवातीला 1 टोल आणि शेवटी एक टोल असेल. तसेच यामध्ये ज्या ज्या हायवे रोडला गाड्या बाहेर पडतील तिथे एक्सिटला एक टोल असेल ज्यामुळे जेवढे अंतर पार केले त्याचेच पैसे टोल स्वरूपात द्यावे लागणार आहेत.

वेगमर्यादा 120 किलोमीटर प्रतितास

इगतपुरीला 7.8 किलोमीटरचा सगळ्यात मोठा टनेल बांधण्यात आला आहे. उर्वरित काही टनेल आहेत ते कमी लांबीचे आहेत. यात 650 किलोमीटरचा रस्त्याचा पल्ला हा 120 मीटरचा असेल. तर उर्वरित 50 किलोमीटर कमी जास्त रुंदीच आहे. जवळपास 150 किलोमीटर प्रति तास असा प्रकल्प असणारा हा देशातील पहिला महामार्ग आहे. मात्र त्याची अधिकृत वेगमर्यादा 120 किलोमीटर प्रतितास इतकीच धरण्यात येणार आहे.

इतर बातम्या

BREAKING – समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

(Maharashtra Samruddhi Mahamarg 74 per cent wok completed : Eknath Shinde)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI