BREAKING – समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव-दुसरबिडमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला.

BREAKING - समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू
Buldhana smaruddhi mahamarg accident

बुलडाणा (सिंदखेडराजा) : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव-दुसरबिडमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला. या ट्रकमध्ये बाहेर राज्यातील (परप्रांतीय) मजूर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

समृद्धी हायवेच्या कामासाठी दुसरबीड येथे मजूर घेऊन हा टेम्पो जात होता. यादरम्यान तळेगाव येथे हा गंभीर अपघात झाला. समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूर परप्रांतीय असल्याचं समोर येत आहे. ट्रकमध्ये एकूण 17 ते 18 मजूर होते. या मजुरांपैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातातल्या गंभीर जखमी मजूरांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम जोरदारपणे सुरु आहे. महामार्गाचं काम करण्यासाठी दररोज हजारो मजूर काम करत आहेत. सिंदखेडराजा जवळच्या तढेगाव-दुसरबिडच्या आसपास मजुरांचा टेम्पो पलटी झाला. यात 13 जणांवर काळाने घाला घातला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Published On - 1:46 pm, Fri, 20 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI