AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur News : बदलापूरच्या घटनेनंतर सरकारची मोठी घोषणा, यापुढे शाळांना पाळावे लागणार हे नियम

Badlapur News : बदलापूरच्या घटनेपासून धडा घेत सरकारने मोठी घोषणा केली आहे. काल बदलापुरात मोठ जनआंदोलन झालं. बदलापुरातील जनता रस्त्यावर उतरली होती. शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे.

Badlapur News : बदलापूरच्या घटनेनंतर सरकारची मोठी घोषणा, यापुढे शाळांना पाळावे लागणार हे नियम
बदलापूरमध्ये चिमकल्यांवर अत्याचारImage Credit source: tv9
| Updated on: Aug 21, 2024 | 1:38 PM
Share

बदलापूर येथील नामांकीत शाळेत घडलेल्या घटनेनतंर जनसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला. काल बदलापूर येथे या घटनेविरोधात मोठं जन आंदोलन झालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे आंदोलन सुरु होतं. त्या शाळेच्या परिसरात मोठा जमाव जमला होता. रेल्वे स्टेशनवर लोक आंदोलनाला बसले होते. पोलिसांवर दगडफेक झाली. आंदोलन मागे घ्यावं, सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजन तिथे आले होते. अखेर रेल्वे रुळावरुन आंदोलक हटत नसल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. बदलापूरमधील या जनआक्रोश आंदोलनाने सरकारला हलवून सोडलय. आजही या घटनेचे पडसाद उमटताना दिसतायत.

सरकार डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आहे. बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेपासून धडा घेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे. बदलापूरच्या शाळेत जे घडलं, तसं पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने हे पाऊल उचललय. सरकार डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात आहे. दुसऱ्याबाजूला या घटनेवरुन राजकारणही सुरु आहे. विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामगिरीं महाराजांना भेटायला वेळ आहे. पण पीडित मुलीच्या घरी जायला त्यांना वेळ नाही अशी टीका सुषमा अंधारे यांनी केले. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत, असही त्या म्हणाल्या.

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काय घोषणा केली आहे?

– मुंबईतील प्रत्येक शिक्षण संस्थेत महिला स्वच्छतागृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

– प्रत्येक शाळेत आत्मरक्षाशी निगडीत अभियानाची सुरुवात केली जाणार आहे,

– शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलीस वेरिफिकेशन करण्याचे आदेश.

– कर्मचाऱ्यांमध्ये बस चालक, वाहक, सुरक्षा कर्मचारी, कॅन्टीनमधील कर्मचारी या सगळ्यांचा समावेश.

– शाळेत महिला पालकांची आणि शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणार.

– प्रत्येक महिन्याला मुलींच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा घेतला जाणार आढावा.

– प्रत्येक शैक्षणिक संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत व्यक्तींना पोलीस पडताळणी बंधनकारक.

– शैक्षणिक संस्थेत सीसीटीव्ही बंधनकारक, पोलिसांनी त्याचा आढावा घ्यावा.

– बदलापूर घटनेनंतर मुंबईत सरकार अलर्ट मोडवर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.