साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; राऊत म्हणतात, हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

| Updated on: Sep 11, 2021 | 2:02 PM

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (sanjay raut)

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; राऊत म्हणतात, हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
sanjay raut
Follow us on

मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच आहे, असा घरचा आहेर संजय राऊत यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तसेच या घटनेवरून राजकारण न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. (after sakinaka rape incident sanjay raut questions on law and order in maharashtra)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य सरकारला आरसा दाखवला आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचं नाव वरच्या स्थानी आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. ही घटना घडली. त्यावरून गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच प्रश्न आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. पण त्यावरून राजकारण करू नका आणि गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं राजकारण करू नये. कारण अशाप्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात, असं राऊत म्हणाले.

राजकारण करू नका

आता काही ठिकाणी माणसं जमवण्याचे प्रकार सुरू आहेत. ते टाळायला हवं. या दुर्देवी घटनेचं राजकारण करणं म्हणजे त्या मृत महिलेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. ते काही काळ थांबलं पाहिजे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना नक्की कठोर शासन होईल, असं त्यांनी सांगितलं. या घटनेची तुलना निर्भया प्रकरणाशी केली जात आहे. तुलना करायला हरकत नाही. कारण यात एका महिलेने जीव गमावला आहे. तिच्या जीवनाची विटंबना झाली आहे. महाराष्ट्रातल्या मातीत त्या काळात छत्रपती महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तोच मार्ग स्वीकारला आहे. अशा दुर्देवी घटना घडू नये म्हणून सरकारने अधिक कठोर पावलं उचलली पाहिजे. सरकार ते उचलल्या शिवाय राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आरोपींना तात्काळ शिक्षा करा

पोलिसांना या पीडित महिलेचं स्टेटमेंट घेता आलं असतं तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या. अधिक माहिती मिळाली असती. तरीही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांच्या लिंकच्या माध्यमातून मुख्य आरोपीला अटक केली आहे, असं सांगतानाच मी सकाळपासून पाहात आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि नेत्या सरकारवर आरोप करत आहेत. काही भूमिका मांडत आहेत. त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतील या सर्वांनी या घटनेचा धिक्कार आणि निषेध नोंदवला आहे. आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. मग ती फाशीही असेल. ती होण्यासाठी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला पाहिजे. मुख्यमंत्री ही मागणी मान्य करतील, असं ते म्हणाले. (after sakinaka rape incident sanjay raut questions on law and order in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

‘त्या’ घटनेचं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं; संजय राऊत विरोधकांवर संतापले

VIDEO: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, गृहमंत्र्यांकडे मागणी करणार: नवाब मलिक

(after sakinaka rape incident sanjay raut questions on law and order in maharashtra)