कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैन्य भरती, MPSC तर्फे लवकरच जाहिराती निघणार, अजित पवारांची माहिती

| Updated on: Sep 23, 2021 | 12:42 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सैन्य भरती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जागा भरण्यासंदर्भात माहिती दिली. कोल्हापूरला डिसेंबर महिन्यात सैन्य भरती होईल, असं अजित पवार म्हणाले आहेत.

कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैन्य भरती, MPSC तर्फे लवकरच जाहिराती निघणार, अजित पवारांची माहिती
ajit pawar
Follow us on

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सैन्य भरती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जागा भरण्यासंदर्भात माहिती दिली. कोल्हापूरला डिसेंबर महिन्यात सैन्य भरती होईल, असं अजित पवार म्हणाले आहेत. तर, राज्याच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्तपदांची माहिती 30 सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं द्यावी, अशा सूचना विभागांना देण्यात आल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैन्य भरती

कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैनिक भरती आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिले आहेत, नियमावलीची अडचण न येता, भरती कशी होईल याचं नियोजन पोलिसांनी करावं, अशा सूचना दिल्या आहेत. राज्यात सैनिकांची भरती असेल तिथे मुलींना संधी मिळावी, असं अजित पवार म्हणाले आहेत.

30 सप्टेंबरपूर्वी MPSC ला माहिती द्या

MPSC बाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाच्या जागा भरायच्या आहेत, त्या जागांची माहिती MPSC ला कळवायचं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांना सांगितलं आहे, जागांची माहिती द्या, अशा सूचना दिल्या असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत जागा येतील. आरक्षण आणि इतर नियमांचं पालन करुन याद्या द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांकडून याद्या आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला माहिती दिली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिराती प्रसिद्ध केली जाईल, असं अजित पवार म्हणाले.

मंत्रिमंडळात अनेक सदस्य वेगवेगळी भूमिका मांडत असतात. नगरपंचायत आणि मुंबई महानगरपालिकेला 1 सदस्य, नगरपालिकेला 2 सदस्य आणि महापालिकांसाठी 3 सदस्य प्रभाग पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. सर्व सदस्यांची भूमिका ऐकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतात. गेल्या सरकारनं 4 सदस्यांचा प्रभाग केला होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 4 सदस्यांचा प्रभाग पद्धत होती. या सर्व प्रकरणात मध्य काढण्यात आला, असं अजित पवार म्हणाले.

सुप्रीम कोर्टात ओबीसी प्रकरणावर म्हणणं मांडलं आहे. केंद्राची सुप्रीम कोर्टातील भूमिका आता पुढं आली आहे. इम्पिरिकल डाटा देऊ शकत नाही, असं केंद्र म्हणतंय. महाविकास आघाडी सरकारला या विषयावरुन बदनाम करण्यात येत होतं. राज्य सरकारला बदनाम करणाऱ्यांचं खर रुप समोर आलं आहे, असं अजित पवार म्हणाले.   राज्यपालांना काय करायचं त्याचा अधिकार आहे, असं मत राज्यपालांनी अध्यादेश रोखल्याच्या चर्चेवर अजित पवार म्हणाले आहेत.

प्रविण दरेकारांनी तक्रार करावी

प्रत्येक संस्थेबद्दल कुणाचं काही मत असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांच्या वेगवेगळ्या विभागामार्फत चौकशी करु शकते. कुणाला काही वाटत असेल, काही माहिती असेल तर तर त्यांनी संबंधितांकडे तक्रार करावी. तक्रारीची चौकशी केली जाईल. तक्रारीत तथ्य असेल तर संबंधितांवर अॅक्शन घेण्यात येईल, जर तथ्य नसेल तर तक्रारीत तथ्य नाही, असं सांगण्यात येईल.

इतर बातम्या:

Nagpur | बर्थडे आहे कोंबड्याचा, जल्लोष साऱ्या कुटुंबाचा, उमरेडमध्ये चक्क कोंबड्याचा वाढदिवस

Nagpur | नागपूरमध्ये कोंबड्याचा वाढदिवस थाटात साजरा केला

Ajit Pawar said Army Recruitment rally will held in December at Kolhapur and MPSC advertisement released soon