अजित पवार म्हणाले 31 जुलैपूर्वी MPSC ची रिक्त पद भरू, नेमकी किती पद रिक्त?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यानं शनिवारी पुण्यातील फुरसुंगी भागात आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा विषय राज्यात चर्चेत आहे.

अजित पवार म्हणाले 31 जुलैपूर्वी MPSC ची रिक्त पद भरू, नेमकी किती पद रिक्त?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यानं शनिवारी पुण्यातील फुरसुंगी भागात आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा विषय राज्यात चर्चेत आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलताना 31 जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रिक्त पद भरली जातील, असं म्हणाले आहेत. (Ajit Pawar said vacant post of MPSC fulfilled till 31st July how many members work in MPSC committee)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील किती पद रिक्त?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील परीक्षा संदर्भातील जबाबदाऱ्या, मुलाखत, धोरण ठरवण्यासाठी 6 सदस्य असतात. हे सदस्य मुलाखत घेण्याच काम करतात. एमपीएससीच्या या समितीच्या सदस्यांची संख्या 6 असते. मात्र, त्यापैकी 2 सदस्य डिसेंबर 2017 आणि जून 2018 मध्ये दोन सदस्य निवृत्त झाले. त्यानंतर राज्य सरकारकडून नव्या सदस्यांची त्यानंतर नियुक्ती झालेली नाही.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षा 2019 मध्ये जाहीर झाला होता. त्या परीक्षेत सुमारे 3600 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या होत्या. सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात काम करणाऱ्या समितीवर 2 सदस्य असल्यानं जोपर्यंत नव्या सदस्यांची नियुक्ती होणार नाही तोपर्यंत लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रिया गतिमान होणार नाही.

31 जुलैपूर्वी एमपीएसीतील रिक्त पदं भरु: अजित पवार

स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आत्महत्या प्रकरणावरून कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सुरुवातीलाच हल्ला चढवला. अधिवेशनात विरोधकांनी एमपीएससीवरून सरकारला कोंडीत घालण्याचा प्रयत्न केला. लाखो पोरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशा वेळी सरकार नेमकं काय करतंय… असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. त्यांनी 31 जुलै 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

संबंधित बातम्या

सगळं कामकाम बाजूला ठेवा, MPSC वर चर्चा करा, किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट पाहणार? फडणवीस आक्रमक

स्वप्नीलच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर लावा, त्याच्या कुटुंबीयांना सरकारनं 50 लाख द्यावेत, सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक

31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार, अजित पवार यांची विधानसभेत मोठी घोषणा

(Ajit Pawar said vacant post of MPSC fulfilled till 31st July how many members work in MPSC committee)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI