आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 9 मार्चला विवाह बंधनात अडकणार

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता या दोघांचे लग्न 9 मार्चला मुंबईत होणार आहे. लग्न समारंभ जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये तीन दिवस असणार आहे. आकाश अंबानीच्या लग्नाची वरात संध्याकाळी 3.30 वाजता मुंबईतील जिओ सेंटरमध्ये जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 9 मार्चला लग्नसोहळा […]

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 9 मार्चला विवाह बंधनात अडकणार
Follow us

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता या दोघांचे लग्न 9 मार्चला मुंबईत होणार आहे. लग्न समारंभ जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये तीन दिवस असणार आहे. आकाश अंबानीच्या लग्नाची वरात संध्याकाळी 3.30 वाजता मुंबईतील जिओ सेंटरमध्ये जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

9 मार्चला लग्नसोहळा पार पडल्यानंतर 10 मार्चला वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. हा कार्यक्रम जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर 11 मार्चला वेडिंग रिसेप्शन असणार आहे. यावेळी दोन्ही परिवार आणि जवळचे मित्रमंडळी असणार आहेत. रिसेप्शन सोहळाही जिओ सेंटर येथे होणार आहे.

बॅचलर पार्टीमध्ये रणबीर कपूर आणि करण जोहर

लग्न सोहळ्याआधी आकाश आपल्या मित्रांना स्वित्झर्लंडमध्ये बॅचलर पार्टी देणार आहे. ज्यामध्ये त्याच्या जवळच्या मित्रांचा समावेश असेल. या पार्टीसाठी आकाश अंबानी लवकरच स्वित्झर्लंडला जाणार आहे. ही पार्टी 23 ते 25 पर्यंत चालणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बॅचलर पार्टीमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींचाही समावेश असणार आहे. रणबीर कपूर आणि करण जोहर सुद्धा स्वित्झर्लंडला जाणार आहेत. ही पार्टी स्वित्झर्लंडमधील St. Moritz येथे आयोजित करण्यात आली आहे.

रणबीर कपूर हा आकाश अंबानीचा जवळचा मित्र असल्याचं बोललं जातं. करण जोहरसोबतही आकाशची चांगली बाँडिंग आहे. विशेष म्हणजे लोकेशनजवळ 500 पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी दोन फ्लाईट्स बूक करण्यात आल्या आहेत.

कोण आहे श्लोका मेहता?          

श्लोका मेहता हिरा व्यापारी रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे. आकाश-श्लोका या दोघांनी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून शिक्षण घेतलं आहे. शाळेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर श्लोका 2009 मध्ये न्यू जर्सीच्या प्रिंसटन यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी गेली. ती द लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स अँड पॉलिटिकल महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदव्युत्तर झाली आहे. श्लोका रोजी ब्लू फाउंडेशनची डायरेक्टर आहे. तसेच ती ConnectFor ची संस्थापक आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI