अमृता फडणवीसांचं ट्विट; उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दांत टीका

| Updated on: Mar 21, 2021 | 11:46 AM

यापूर्वी सचिन वाझे प्रकरणावरूनही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते. | Amruta Fadnavis Parambir singh letter bomb

अमृता फडणवीसांचं ट्विट; उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दांत टीका
सचिन वाझे प्रकरणावरूनही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते.
Follow us on

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही आता परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बवरुन ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी एक चारोळी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. महाविकासाआघाडी ही एकत्र मिळून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला. (Amruta Fadnavis on Parambir singh letter bomb)

यापूर्वी सचिन वाझे प्रकरणावरूनही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते. ठाकरे सरकार सचिन वाझे (Sachin Vaze) याच्यासारख्या आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आखत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

एकीकडे नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळात जागा उरलेली नाही. तर दुसरीकडे ठाकरे सरकार कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तसेच आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या योजना आखल्या जात आहेत, असे त्यांनी म्हटले होते.

‘सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांचा जंगलातील जमिनीवर बंगला’

काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी अलिबागमधील जमिनीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला होता.

किरीट सोमय्यांच्या या ट्विटला अमृता यांनी रिट्विट करत त्यावर विशेष टिप्पणी केली होती. सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांनी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

संबंधित बातम्या:

रोहित पवार म्हणाले, तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात, आता अमृता फडणवीस म्हणतात..

Amruta Fadnavis | ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित!

तुम्हाला अ‍ॅक्सिस बँकेने प्रमोशन का दिले, किती फायदा करुन दिलात; अमृता फडणवीस म्हणाल्या…

(Amruta Fadnavis on Parambir singh letter bomb)