रोहित पवार म्हणाले, तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात, आता अमृता फडणवीस म्हणतात..

महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती. | Rohit Pawar Amruta Fadnavis

रोहित पवार म्हणाले, तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात, आता अमृता फडणवीस म्हणतात..
महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे ट्विट करुन कौतुक केले होते. या ट्विटला आता अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी रिप्लाय दिला आहे. धन्यवाद रोहित भाऊ, असे म्हणत अमृता फडणवीसांना रोहित पवारांचे आभार मानले. (Amruta Fadnavis new song kuni mhnale vedi)

रोहित पवार काय म्हणाले?

महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती. काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित

गेल्या अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांना उत्सुकता असलेले अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे सोमवारी प्रदर्शित झाले. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे.

अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मूळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

संबंधित बातम्या:

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

VIDEO: अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ऐकलंत का?

व्हॅलेंटाईनच्या दिवशी अमृता फडणवीसांचं नवं गाणं, आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘नाईस व्हॉइस…!’

(Amruta Fadnavis new song kuni mhnale vedi)

Published On - 3:23 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI