AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ थोडा कठीण, मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये : अनिल परब

अनिल परब यांनी प्रवीण दरेकरांना प्रत्युत्तर देत कलम 302 कधी लागतं याचा आधी नीट अभ्यास करावा, असा खोचक सल्ला दिलाय.

काळ थोडा कठीण, मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये : अनिल परब
| Updated on: Nov 09, 2020 | 4:05 PM
Share

मुंबई : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब हेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्यावर कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर अनिल परब यांनी दरेकरांना प्रत्युत्तर दिलंय. कलम 302 कधी लागतं याचा प्रवीण दरेकर यांनी आधी नीट अभ्यास करावा, असा खोचक सल्ला परब यांनी दिलाय. ते एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या मुद्द्यावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत होते (Anil Parab comment of Suicide of ST Employee and Pravin Darekar).

अनिल परब म्हणाले, “एसटी कामगारांच्या 3 थकीत वेतनापैकी एक वेतन तात्काळ देण्यात येणार आहे. तसेच आणखी एक वेतन दिवाळीच्याआधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल. याशिवाय सणाची अग्रीम रक्कमही (बोनस) कामगारांना मिळेल. एसटीच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वचजण संकटात आहेत. राज्य शासनाकडे देखील पैशाची आवक कमी आहे. एसटीची परिस्थिती किती वाईट आहे हे सर्व कर्मचारी जाणतात. एसटी प्रवाशीच नसल्याने आपलं दररोजचं उत्पन्न बंद झालं आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा भार उचलावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे.”

“थोडा कठिण काळ आहे, मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी निराश आणि हताश होऊ नये. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. आत्महत्येने आपल्या कुटुंबावरील संकट संपणार नाही. यामुळे आपलं कुटुंब रस्त्यावर येईल. हे संकट तात्पुरतं आहे, त्यावर आपण नक्कीच मार्ग काढू. मी एक महिन्याच्या पगाराची व्यवस्था केली आहे. आणखी एका पगाराची व्यवस्था दिवाळीपूर्वी करतो. यामुळे थकीत वेतनातील अधिकाधिक वेतन आणि अग्रीम रक्कम कर्मचाऱ्यांना मिळेल,” असंही अनिल परब यांनी सांगितलं.

‘राज्य सरकारने काही दिवस कामगारांच्या पगाराची जबाबदारी घ्यावी’

अनिल परब म्हणाले, “आम्ही बँकेंकडे कर्ज मागितलं आहे. कर्मचाऱ्यांचे दरमहिन्याला पगार तर द्यावे लागतातच, पण उत्पन्न वाढीचा स्त्रोत वाढवण्यासाठी देखील निधी आवश्यक आहे. एसटीला डिझेल आणि इतर सामानाचीही गरज असते. मात्र, सध्याच्या आर्थिक तरतुदीत कामगारांचे पगारही पूर्ण होत नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. अजित पवार यांच्याशी देखील बोलणार आहे. राज्य सरकारने काही दिवस कामगारांच्या पगाराची जबाबदारी घ्यावी अशी विनंती केली आहे. राज्य सरकार एसटीला नक्कीच मदत करेल. एसटी गरिबांची जीवनवाहिनी आहे. जर एकरकमी रक्कम मिळाली तर त्याचा अधिक उपयोग होईल.”

“एसटी महामंडळाबाबत उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु”

“माझा प्रयत्न कामगारांचे थकित वेतन देण्याचा आहे. त्यासाठी आर्थिक तरतुद करायचा आहे. एसटी महामंडळाबाबत उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी मालवाहतूक, पेट्रोल पंप, टायर मोल्डिंग, बॉडी बिल्डिंग अशी कामं केवळ एसटीसाठी न ठेवता इतरांसाठी देखील करणे सुरु केले आहे. मात्र, सध्याचे पैसे पगार आणि डिझेल यातच जात आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

तासाभरात 1 महिन्याचा, तर दिवाळीपूर्वी 2 महिन्यांचा पगार आणि बोनस जमा करणार, ST कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांचा 3 महिन्याचा पगार थकीत!, कुर्ला डेपोत एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, ज्यांना राजकारण करायचंय त्यांना करु द्या : अनिल परब

संबंधित व्हिडीओ :

Anil Parab comment of Suicide of ST Employee and Pravin Darekar

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.