.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल परब यांनी म्हाडाचे सीईओ यांना असं घेतलं फैलावर; नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला पाठवा, तोवर…

शिवसैनिकांना ताब्यात घेणं सोडा अन्यथा मुंबईतील शिवसैनिक येथे येतील, असा इशाराही परब यांनी दिला. म्हाडा अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाबतही नोटीस का पाठविली म्हणून अनिल परब प्रचंड संतापलेले होते.

अनिल परब यांनी म्हाडाचे सीईओ यांना असं घेतलं फैलावर; नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला पाठवा, तोवर...
Anil ParabImage Credit source: tv9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 31, 2023 | 4:15 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी म्हाडाच्या सीईओ (CEO of MHADA) यांना फैलावर घेतलं. नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा, तोवर जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पाडलेल्या कार्यालयाशी माझा संबंध आहे का, असा सवालही अनिल परब यांनी विचारला. तासभर बसून म्हाडाच्या कार्यालयात अनिल परब यांनी चर्चा केली. तसेच अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अनिल परब यांचे कार्यकर्ते म्हाडाच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते. शिवसैनिकांनी यावेळी घोषणाबाजी केली. म्हाडाच्या रहिवासी इमारतीमध्ये माझं कार्यालय होतं. मी त्या इमारतीचा रहिवासी होतो. सोसायटीच्या परवानगीनं मी माझं कार्यालयं तिथं उभारलं होतं. मात्र, किरीट सोमय्या यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली, असा आरोप अनिल परब यांनी केला.

म्हाडाचे सीईओ मिलिंद बोरीकर आणि अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत शिवसैनिक आणि अनिल परब हे म्हाडा अधिकाऱ्यांना झापत होते.

नोटीस कशी पाठविली?

अनिल परब यांनी आल्याआल्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की, माझा या कार्यालयाशी काही संबंध आहे का? अधिकाऱ्यांनी नाही म्हटलं. मग मला नोटीस कशी पाठविण्यात आली, असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला.

नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्यावर काही कारवाई करणार आहात का. त्यावर अधिकारी म्हणाले. तपासावं लागेल. त्यावेळी कोण होते. स्टेट मॅनेजर किती आहेत. तुमच्याकडं रेकॉर्ड नाही का, यावर अधिकाऱ्यांनी थोडा वेळ मागितला.

अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासाठी काम करतात का?

अनिल परब म्हणाले, तुम्ही रेकार्ड रेग्युलर करणार नव्हते. मग, हे कार्यालय लोकांनी तोडलं. अधिकारी आले नि त्याची पाहणी करून गेले. तरीही तुमच्या अधिकाऱ्यांनी नोटीस का काढली. तुमचे अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासाठी काम करतात का, असा सवालही अनिल परब यांनी केला.

जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांना इथं बोलवा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्याशिवाय इथून जाणार नसल्याचा इशाराचं त्यांनी दिला.

अन्यथा मुंबईतील शिवसैनिक येथे येतील

म्हाडाच्या परिसरात शिवसैनिक जमलेले होते. त्यांना पोलीस ताब्यात घेत असल्याची बातमी परब यांना मिळाली. परब यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. शिवसैनिकांना ताब्यात घेणं सोडा अन्यथा मुंबईतील शिवसैनिक येथे येतील, असा इशाराही परब यांनी दिला. म्हाडा अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाबतही नोटीस का पाठविली म्हणून अनिल परब प्रचंड संतापलेले होते.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर