मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख, अर्णब गोस्वामींना विधीमंडळ समितीचे समन्स

| Updated on: Mar 03, 2021 | 10:36 AM

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विधीमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर (Arnab Goswami Summoned) हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख, अर्णब गोस्वामींना विधीमंडळ समितीचे समन्स
अर्णब गोस्वामी
Follow us on

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विधीमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर (Arnab Goswami Summoned) हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग मांडण्यात आला आहे. त्याप्रकरणी अर्णब गोस्वामींना दुसऱ्यांदा विधीमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे (Arnab Goswami Summoned To Present In Front Of Legislative Committee).

यापूर्वीही अर्णब गोस्वामींना नोटीस

यापूर्वीही अर्णब गोस्वामींना हजर राण्यासाठी नोटीस बजावण्यात आला होता. मात्र, तेव्हा ते हजर न राहिल्याने त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे. आज बुधवारी (3 मार्च) अर्णब गोस्वामी यांना विधीमंडळात हजर राहावं लागणार आहे.

अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

सप्टेंबर महिन्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. यापूर्वीही हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावूनही गोस्वामी गैरहजर राहिले होते. त्यामुळे आता हक्कभंग समितीने गोस्वामी यांना समन्स बजावले आहे.

सुनील प्रभू यांची माहिती

“बुधवारी सायंकाळी विधीमंडळात 5 वाजता हक्कभंग मांडण्यात येणार आहे. अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात सुनील प्रभू आणि आमदार प्रताप सरनाईक यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. 7/11 अन्वय सुनील प्रभू अर्णब गोस्वामी आणि आमदार प्रताप सरनाईक साक्ष घेतली जाणार आहे. या अनुसार त्यांना नोटीस दिली आहे”, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली.

Arnab Goswami Summoned To Present In Front Of Legislative Committee

संबंधित बातम्या :

Arnab Goswami : ‘निर्देशांचं पालन करा, अन्यथा कारवाई’, अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ

अर्णव गोस्वामींना तीन दिवस आधी हल्ल्याची माहिती कशी?; केंद्राने उत्तर द्यावं: अनिल देशमुख

राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला