अशा भुलथापांना बळी पडू नका, ज्येष्ठ नागरिकांची केली जाते फसवणूक

त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ असाल आणि किमती वस्तू तुमच्याकडे असतील, तर सावध राहा. अन्यथा फसवणूक करणारे समाजकंटक फिरत असतात.

अशा भुलथापांना बळी पडू नका, ज्येष्ठ नागरिकांची केली जाते फसवणूक
| Edited By: | Updated on: Jul 11, 2023 | 6:17 PM

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना हेरायचं. त्यांच्याकडे असलेल्या वस्तू हडपायच्या अशी क्लुप्ती काही आरोपी करतात. मुंबईत ज्येष्ठ नागरिक पाहून त्यांना सांगायचं की, समोर दुर्घटना घडली आहे. गर्दी आहे. म्हणून तुम्ही सावध राहा. आपल्या वस्तू सांभाळून ठेवा. किमती वस्तू व्यवस्थित सांभाळा. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक किमती वस्तू बाजूला काढून ठेवत. अशावेळी हातचलाखी करून त्यांच्या वस्तू घेऊन पळून जाणारे काही आरोपी होते. अशा एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ असाल आणि किमती वस्तू तुमच्याकडे असतील, तर सावध राहा. अन्यथा फसवणूक करणारे समाजकंटक फिरत असतात.

अशी करायचा फसवणूक

पोलीस असल्याचे भासवून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबईतील कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. चालताना ज्येष्ठ नागरिकाना सांगत असे की, पुढे एक खून झाला आहे. तपासणी सुरू आहे. तुमचे जे काही सामान आहे ते मी पॅक करून तुम्हाला देतो. असे सांगून तो ज्येष्ठ नागरिकांचे सोन्याचे दागिने रुमालात ठेवायचा. हातसफाई करून रुमाल बदलायचा. ज्येष्ठ नागरिक घरी गेल्यावर उघडले की त्याला ते खडे भरलेले दिसायचे.

या आरोपीला पोलिसांनी केली अटक

24 जून रोजी कस्तुरबा पोलिसांना पोलीस असल्याची बतावणी केली. एका वृद्ध व्यक्तीकडून 20 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम लुटून पळवून नेली. अशी तक्रार कस्तुरबा पोलिसांना मिळाली होती. या घटनेनंतर कस्तुरबा पोलिसांनी माहीम मच्छिमार कॉलनीतून आरोपीला अटक केली. संजय दत्ताराम मांगडे असे आरोपीचे नाव आहे.

बनावट पोलीस असल्याचे दाखवून फसवणुकीचे ५० हून अधिक गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
अशी माहिती कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल आव्हाड यांनी दिली.