मोदी सरकारची कोती मनोवृत्ती उघड; खेलरत्न पुरस्काराच्या नामकरणावरुन अशोक चव्हाणांची टीका

खेलरत्न पुरस्काराच्या नावातून दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव वगळल्याने त्यांची महती कमी झालेली नाही, मात्र मोदी सरकारची कोती मनोवृत्ती उघडी पडली आहे, अशी बोचरी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मोदी सरकारची कोती मनोवृत्ती उघड; खेलरत्न पुरस्काराच्या नामकरणावरुन अशोक चव्हाणांची टीका
अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 7:58 PM

मुंबई : खेलरत्न पुरस्काराच्या नावातून दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव वगळल्याने त्यांची महती कमी झालेली नाही, मात्र मोदी सरकारची कोती मनोवृत्ती उघडी पडली आहे, अशी बोचरी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. (Ashok Chavan criticize Modi government over renaming of Khel Ratna award)

चव्हाण म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारकडे नवनिर्मितीच्या दृष्टीची वाणवा असून, त्यांची कार्यक्षमता केवळ कुत्सित राजकारण करण्याइतपत मर्यादित आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या काळातील योजना असो वा पुरस्कार, राजकीय हेतूने त्यांचे नामकरण करण्याचा एकमेव उद्योग मागील सात वर्षांपासून सुरू आहे. मेजर ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाविषयी कोणाचेही दूमत असण्याचे कारण नाही. त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी एखादा भरीव उपक्रम सुरू करणे मोदी सरकारला सहज शक्य होते. परंतु, त्याऐवजी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या नावे असलेल्या पुरस्काराचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करण्याचा उदात्त हेतू नसून, राजीव गांधी यांचे नाव हटवण्याचा छुपा अजेंडा आहे.

राजीव चव्हाण म्हणाले की, राजीव गांधी हे युवकांचे नेते होते, भारताचे सर्वात तरूण पंतप्रधान होते. नवी दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्या स्पर्धेतून त्यांचे क्रीडा प्रेम व व्यवस्थापन कौशल्य दिसून आले होते. याच स्पर्धेच्या निमित्ताने भारतात रंगीत टीव्हीचे युग सुरू झाले होते. खेळावर प्रेम करणारे तरूण नेते म्हणून खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव संयुक्तिकच होते. मात्र मोदी सरकारने गांधी-नेहरू घराणाच्या द्वेषातून हे नामकरण केले असून, त्यांचा हा द्वेष निंदनीय आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी ट्विट करत खेलरत्न पुरस्काराचं (Khel Ratna Award) नाव बदलल्याची घोषणा केली. भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांच्या नावानं असावं, असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो, असं म्हटलं आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, असं म्हटलं. माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव पुरस्काराला देण्यात आलं आहे.

इतर बातम्या

मोदींनी राजीव गांधींचं नाव हटवलं, काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया, नेमकं काय घडतंय?

Special Report : ज्यांच्यासाठी राजीव गांधींचे नाव हटवले, ते मेजर ध्यानचंद कोण होते?

Khel Ratna Award: खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार!

(Ashok Chavan criticize Modi government over renaming of Khel Ratna award)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.