मुंबईचं नेमकं काय चुकलं? झाडं उन्मळून का पडली; खरं कारण समोर, अश्विनी भिडे म्हणाल्या…

धरण क्षेत्रात आजदेखील चांगला पाऊस पडतोय. 1 टक्के धरण क्षेत्रात पाणी वाढतं तेव्हा एक दिवस पाणी पुरतं. मुंबईत खूप मोठा पाऊस पडला. आता पुढील दिवस पाऊस कमी आहे. त्यानंतर आणखी पाऊस चांगला आहे. त्यानुसार पाण्याचं नियोजन सुरू आहे, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

मुंबईचं नेमकं काय चुकलं? झाडं उन्मळून का पडली; खरं कारण समोर, अश्विनी भिडे म्हणाल्या...
ashwini bhide
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2026 | 6:12 PM

Mumbai Water And Rain : जुलै महिन्यातील पहिल्याच आठवड्यात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईची चांगलीच दाणादाण उडाली. आमची यंत्रणा सज्ज आहे, पावसाळ्याआधीची सर्व कामे करण्यात आली आहेत, असे मुंबई महापालिकेकडून सांगितले जात होते. परंतु पहिल्या आठवड्याच्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, आता या पावसामुळे मुंबईचे काय नुकसान झाले, मुंबईचे हे नुकसान नेमके का झाले? याविषयीची सविस्तर माहिती माहापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे. यावेळी झाडे तुटण्याच्या सर्वाधिक घटना का घडल्या, याची माहिती त्यांनी दिली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी

अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुंबई शहरातील पाणीपुरवठा आणि धरणांविषयी सविस्तर माहिती दिली. मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या धरणामध्ये पाणीसाठा चांगला झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. मात्र हा पाणीसाठा समाधानकारक आहे. 2024 सालच्या तुलनेत यंदा पाणीसाठी चांगला आहे. 2025 सालच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबई शहरात समाधानकारक पाऊस पडला

तसेच, धरण क्षेत्रात आजदेखील चांगला पाऊस पडतोय. 1 टक्के धरण क्षेत्रात पाणी वाढतं तेव्हा एक दिवस पाणी पुरतं. मुंबईत खूप मोठा पाऊस पडला. आता पुढील दिवस पाऊस कमी आहे. त्यानंतर आणखी पाऊस चांगला आहे. त्यानुसार पाण्याचं नियोजन सुरू आहे. जुलैच्या 1 तारखेपासून मुंबईत चांगला पाऊस पडतोय. जुनच्या सरासरी पावसाच्या प्रमाणात जुलैमध्ये चांगला पाऊस पडतोय. यावर्षी 2024 मिमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यापैकी 40 टक्के पाऊस मुंबईत पडला आहे. मुंबई शहरात समाधानकारक पाऊस पडला आहे. पण धरण क्षेत्रात आणखी पावसाची गरज आहे, असेही अश्विनी भिडे म्हणाल्या.

यावर्षी 1238 झाडाच्या फांद्या पडल्या

यावर्षीच पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण अधिक होतं. सगळ्यात जास्त नुकसान हे झाडांचं झालं आहे. जेवढी वर्षाला झाड पडतात त्यापेक्षा 50 टक्के झाडं एका दिवसात पडली आहेत. या पावसाळ्यात वाऱ्याचा वेग जास्त राहिला आहे. जेवढी झाडं पडतात तेवढ्याच फांद्या पडतात. यावर्षी 1238 झाडाच्या फांद्या पडल्या आहेत. झाड पडल्याने दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. नाले भरले आणि हाय टाईड होती. तेव्हा मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं होतं,अशी माहिती अश्विनी भिडे यांनी दिली.

Follow Us