AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई हादरली! डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार करण्यात आला आहे. डोक्यार्ड रोड परिसरात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई हादरली! डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार
डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबारImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 12, 2026 | 9:31 PM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार करण्यात आला आहे. डोक्यार्ड रोड परिसरात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. मांडीला गोळी लागल्याने आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेनं मुंबई शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार करण्यात आला आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. मुंबईच्या डोक्यार्ड रोड परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. आसीफ दाढीचा मुलगा समीर शेख याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला, या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत.  समीर शेख याच्या मांडीला गोळी लागल्याने त्याला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  समीर शेख याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या घटनेत समीर शेख जखमी झाला आहे. त्याच्या मांडीला गोळी लागली आहे. मात्र समीर शेख याच्यावर नेमका गोळीबार का करण्यात आला? गोळीबाराचं नेमकं कारण काय होतं? हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांकडू हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

विरारमध्ये दगडाने ठेचून एकाची हत्या 

दरम्यान दुसरीकडे विरारमध्ये देखील एक अशीच घटना समोर आली आहे. विरारमध्ये भरदिवसा एका आरटीआय कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं शहर हादरलं आहे. आत्माराम पाटील असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?