राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली : अतुल भातखळकर

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर शिवसेनेवर निशाणा साधला आहे (Atul Bhatkhalkar slams shivsena)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:46 PM, 24 Jan 2021
राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली : अतुल भातखळकर

मुंबई : भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी पत्रकार दिनेश कानजी यांच्या लेखाची लिंक शेअर करत शिवसेनेवर टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेनेला जागा दाखवली, असं लेखाचं शिर्षक आहे. हेच शिर्षक लिंकसोबत शेअर करत भातखळकर यांनी टीका केली आहे (Atul Bhatkhalkar slams shivsena).

लेखात नेमकं काय म्हटलंय?

‘न्यूज डंका’मधील दिनेश कानजी यांच्या लेखात शिवेसेनेवर टीका करण्यात आली आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणासाठी चार ओळीचा ट्विट ही केला नाही. सामनातून दर चार दिवसांनी राहुल गांधी यांची आरती ओवाळली जात असताना त्यांनी मात्र शिवसेनेला जागा दाखवून दिली”, असा घणाघात दिनेश कानजी यांनी लेखात केला आहे (Atul Bhatkhalkar slams shivsena).

“मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी इंदिरा गांधींपासून अहमद पटेलांपर्यंत सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला त्यांना अभिवादन करावेसे वाटले नाही. शिवसेनाप्रमुखांना अनुल्लेखाने मारण्याचा हा प्रकार होऊनसुद्धा गप्प बसणे ही शिवसेनेची लाचारी नाही का? असा सवाल नेटकरी करत आहेत”, असं लेखात म्हटलं आहे.

“काँग्रेसकडून शिवसेनेचा असा सतत पाणउतारा होत असताना शिवसेना मात्र सत्तेच्या लोभासाठी त्यांना घट्ट चिकटून बसली आहे. अपमानाकडे दुर्लक्ष करून वारंवार सामनामधून राहुल गांधींवर स्तुती सुमनांची उधळण केली जाते. शिवसेनेच्या या दयनीय अवस्थेवर सोशल मीडियातून झोड उठवण्यात आली”, असंदेखील लेखात म्हटलं आहे.

हेही वाचा : नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदावर काँग्रेसची फुली?; वाचा, काय आहे अंदर की बात?