कांदिवलीत अजानवेळी मनसेच्या भोंग्यातून वाजली हनुमान चालिसा, पोलीस म्हणतात Video जुनाय, खरं काय?

Kandiwali Loudspeaker : राज ठाकरे यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्याना विरोध केलाय. या भोंग्यावरुन केल्या जाणाऱ्या अजानला हनुमान चालिसेनं प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात येतंय.

कांदिवलीत अजानवेळी मनसेच्या भोंग्यातून वाजली हनुमान चालिसा, पोलीस म्हणतात Video जुनाय, खरं काय?
काय खरं? काय खोटं?
Image Credit source: TV9 Marathi
गोविंद ठाकूर

| Edited By: सिद्धेश सावंत

May 04, 2022 | 8:09 AM

मुंबई : संपूर्ण राज्यात मनसे कार्यकर्ते (MNS Workers) आक्रमक झाले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray News) यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्याना (Loudspeaker Row) हनुमान चालिसेनं उत्तर देण्यास सुरुवात केली. दरम्यान, याच संदर्भातला एक व्हिडीओ मुंबईच्या कांदिवली भागातून समोर आला. या व्हिडीओमध्ये अजानवेळी हनुमान चालिसेचं पठण भोंग्यातून झाल्याचं दिसून आलंय. दरम्यान, पोलिसांनी मात्र हा व्हिडीओ जुना असल्याचा दावा केला आहे. अजानवेळी हनुमान चालिसा वाजवतानाचा व्हिडीओ आजचा नसल्याचं डीसीपी विशाल ठाकूर यांनी टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याशी बोलताना म्हटलंय. तर मनसे कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ आज सकाळचाच असल्याचीही माहिती मिळते आहे. हा व्हिडीओ संजय नगर, गांधी नगर येथील मशिदीतून अजानच्या वेळी बनवण्यात आला होता. या व्हिडीओबाबत आता नेमकं खरं कोण बोलतंय? खोटं कोण बोलतंय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

भोंग्यांना विरोध…

राज ठाकरे यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्याना विरोध केलाय. या भोंग्यावरुन केल्या जाणाऱ्या अजानला हनुमान चालिसेनं प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात येतंय. राज्य सरकारला 4 मे पर्यंतचा अल्टीमेटम राज ठाकरे यांनी दिला होता. चार मेपर्यंत भोंग्यांवर कारवाई केली गेली नाही. त्याला मनसे हनुमान चालिसेनं उत्तर देईल, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे बुधवारी सकाळपासूनच अजानला मनसैनिकांनी भोंग्यांवर हनुमान चालिसा लावत आव्हान दिलंय.

मुंबईतील कांदिवली पश्चिम चारकोप विधानसभेच्या संजय नगरमध्ये मनसेतर्फे अजानच्या वेळी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आलं. हा व्हिडिओ आज (बुधवार, 4 मे) पहाटे 5 वाजल्याचा आहे. प्रार्थना सुरू असताना त्याचवेळी मनसे विभागातील व्यक्ती हनुमान चालिसेचे पठण केलं. शिवाय मनसेचा झेंडाही यावेळी एका मनसैनिकानं फडकावला.

पाहा व्हिडीओ :

मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त

मनसेच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीसही सतर्क झाले आहेत. राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरीक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यानंतर बहुतांश ठिकाणी मुस्लिम बांधवांनीही भोंग्याविना अजान झाल्यानंतर नमाज पठण केलंय.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें