AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu : मंत्रीपद हा आमचा अधिकार, अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास; मंत्रिमंडळ विस्तारात नाव नसल्यानं बच्चू कडूंची नाराजी

आमचा प्रहार पक्ष आहे. मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही. त्यामुळे निश्चितच यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता, असे बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu : मंत्रीपद हा आमचा अधिकार, अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास; मंत्रिमंडळ विस्तारात नाव नसल्यानं बच्चू कडूंची नाराजी
बच्चू कडू/एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 09, 2022 | 11:03 AM
Share

मुंबई : मंत्रीपद हा आमचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार आणि शिंदे गटाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांचे नाव नाही. यावरून बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात कोणत्याही अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात (Cabinet expansion) स्थान देण्यात आलेले नाही. राजभवनातील (Raj bhavan) दरबार हॉलमध्ये ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये संदिपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार, गुलाबराव पाटील, संजय राठोड अशा विविध नेत्यांची नावे दिसत आहेत. आता यावरून बच्चू कडू नाराज असल्याचे दिसत आहे.

‘दोन पावले मागे यावे लागते’

आमचा प्रहार पक्ष आहे. मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही. त्यामुळे निश्चितच यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता. तसेच येणाऱ्या विस्तारात मंत्रीपद देऊ, असे ते म्हणाले होते. मात्र, काही तांत्रिक कारण असेल. त्यामुळे अपक्षांना मंत्रीपद देण्यात आलेले नाही. कधी-कधी दोन पावले मागे यावे लागते. त्यामुळे अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

काय म्हणाले बच्चू कडू?

‘विचार करावाच लागेल’

मी तरी मनावर घेत नाही. विविध योजनांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मंत्रीपद तर आमचा अधिकार आहे, तो आम्ही मिळवणारच. मात्र सोबतच जनतेची कामेही महत्त्वाची आहेत. विविध कामे आहेत. त्यामुळे हे सरकार अपक्षांशिवाय राहू शकत नाही. मोठी संख्या आहे. त्यांना आमचा विचार करावाच लागेल. राजकारणात गोपनीयता ठेवावी लागते, असे अनेक आमदारांना निमंत्रण न मिळाल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. तसेच त्यांनी शब्द दिला आहे. त्यावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी आपल्याला म्हटल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

Follow Us
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....