डॉ. भारत पाटणकर यांच्या पत्नी, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्व्हेट यांचं निधन

श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर (Bharat patankar) यांच्या सहचारिणी गेल ऑम्व्हेट (Gail Omvedt) यांचं निधन झालं आहे. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालंय.

डॉ. भारत पाटणकर यांच्या पत्नी, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्व्हेट यांचं निधन
डॉ. भारत पाटणकर यांच्या सहचारिणी गेलअ‍ॅम्व्हेट यांचं निधन झालं आहे.
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 1:11 PM

सांगली : श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर (Bharat patankar) यांच्या सहचारिणी गेल ऑम्व्हेट (Gail Omvedt) यांचं निधन झालं आहे. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण मांडणी करुन तो अभ्यास समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक-लेखिका म्हणून त्यांनी ओळख होती.

भारत पाटणकर यांच्या खांद्याला खांदा लावून गेल याचं कष्टकऱ्यांसाठी काम

गेल ऑम्व्हेट यांचा जन्म अमेरिकेत झाला होता. उच्च शिक्षण घेतलेल्या, उंच, गोऱ्या, निळ्या डोळ्याच्या, सोनेरी केसाच्या गेल भारतात अभ्यासाच्या निमित्ताने आल्या. संपूर्ण भारतभर फिरल्या. इथल्या अनेक चळवळींचा जवळून अभ्यास केला. अभ्यास करता करता कष्टकऱ्यांच्या चळवळींचा एक भाग बनल्या. चळवळींना एक भक्कम वैचारिक पाया तयार करण्यास त्यांनी मदत केली.

कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी आयुष्य समर्पित

भारत पाटणकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी गेल ऑम्व्हेट राहिल्या. मोर्चे, आंदोलनात चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी कामगार कष्टकऱ्यांचं नेतृत्व केलं. परिश्रमातून कमावलेले ज्ञानच नव्हे तर आपलं सारं आयुष्य इथल्या कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी गेल यांनी समर्पित केलं.

अमेरिकेत जन्म, अभ्यासासाठी भारतात, भारत पाटणकरांशी  प्रेमविवाह

आंतरराष्टीय पातळीवर ज्यांच्या संशोधनाचा दबदबा आहे आणि जागतिक स्तरावर एक विदुषी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या डॉ. गेल अ‍ॅम्व्हेट अर्थात शलाका भारत पाटणकर यांचा जीवन प्रवास चित्रपटाच्या कथेला लाजवेल असा आहे.अमेरिकेतल्या एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म घेतलेल्या गेल तशा मुळातच हुशार. कार्लटेन कॉलेजमध्ये ( carlten college ) पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मिन्याप्यालीस विद्यापीठातून ( minneapalis university ) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

संपूर्ण जगाला ज्या अमेरिकेचं आकर्षण आहे पण वैभवशाली अमेरिकेत पायाशी सारी सुखं लोळण घेत असतानाही गेल भारतात आल्या. कारण त्यांची मानवतावादावर अपार निष्ठा होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अमेरिकेच्या युद्धखोर साम्राज्यवादी धोरणांच्या विरोधात उभा राहिलेल्या विद्यार्थी चळवळीत त्या सक्रीय झाल्या. विद्यार्थी चळवळीतच त्यांच्या पुढील जीवनाची दिशा निश्चित झाली. भांडवली विकासात होणाऱ्या कामगार कष्टकऱ्याच्या शोषण त्या जवळून पाहत होत्या. वर्गीय आणि लैंगिक शोषण पाहून त्या अस्वस्थ होत होत्या. त्यामुळे आपण कोणासाठी काम करायचं याची धारणा विद्यार्थी दशेतच पक्की झाली होती.

अभ्यासाच्च्या निमित्ताने त्या भारतात आल्या. भारतीय समाजक्रांती वर्गीय, जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत एकाचवेळी केल्याशिवाय होणार नाही, अशी त्यांची पक्की धारणा झाली. त्यांनी कामाला सुरुवात केली.

कष्टकऱ्यांच्या चळवळीत झोकून देवून काम करणाऱ्या डॉ. भारत पाटणकर या जीवनदानी कार्यकर्त्यासोबत त्यांचा प्रेमविवाह झाला. आयुष्यभर स्वतःचं संशोधन, नोकरी असा व्याप सांभाळत एका पूर्णवेळ कार्यकर्त्याचा संसार सांभाळण्याचं अवघड काम गेल यांनी लीलया पेललं. स्वतः नोकरी केली, लिखाण केलं, संशोधन केलं त्यातून जे काही पैसे मिळाले ते सगळे पैसे कष्टकऱ्यांच्या चळवळीवर खर्च केले.

चळवळीसाठी तन मन धनाने काम

स्वतःच्या गरजा कमी केल्या पण चळवळ पैशाअभावी थांबू दिली नाही. आज श्रमिक मुक्ती दल आणि डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दहा बारा जिल्ह्यामध्ये जी काही चळवळ उभी आहे त्यामागे डॉ. गेल यांचा फार मोठा त्याग आहे.

अमेरिकेतल्या गोऱ्या मॅडम बघता बघता अस्सल मराठमोळ्या बाई कधी बनल्या तेच कळलं नाही. सांगली जिल्ह्यातल्या परित्यक्त्या स्त्रियांची ती मैत्रीण बनली. क्रांतीविरांगना इंदुताई पाटणकर या आपल्या सासुबाईला सोबत घेऊन त्या जिल्हाभर फिरल्या. नवऱ्याने सोडलेल्या, एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना त्या भेटल्या. त्यांना संघटीत केलं. त्यांना आत्मभान दिलं. त्यांच्या हक्काची जाणीव त्यांना करुन दिली. लढण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण केली. आणि परित्यक्त्यांच्या हक्काचा एक ऐतिहासिक लढा यशस्वी करुन दाखविला. आपल्या सहकारी मैत्रिणींच्या मदतीन बहे ता. वाळवा जि. सांगली येथे परीतक्त्यांची स्वमालकीची घरे उभा करुन दाखवली.

गेल यांचं लिखाण-संशोधन समाज बदलाच्या चळवळींना मार्गदर्शक ठरेल

डॉ. गेल यांचं संशोधन, त्यांचं लिखाण, त्यांचा कष्टकऱ्यांच्या चळवळीतील सहभाग, त्यांचा त्याग यातून केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या पिढी समोर त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांचं लिखाण आणि संशोधन समाज बदलाच्या चळवळींना मार्गदर्शक ठरेल.

गेल ऑम्व्हेट यांची साहित्यसंपदा

डॉ. गेल यांची पंचवीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रिवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे.

(Bharat patankar wife Gail Omvedt pass Away)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.