AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साकीनाका बलात्कारप्रकरणी राजावाडी रूग्णालयाबाहेर भीम आर्मीची निदर्शने

साकीनाका येथे एका पीडितेवर झालेल्या अत्याचारानंतर तिचा आज दुर्दैवी मृत्य झाला. या प्रकरणी भीम आर्मी मुंबई प्रदेशच्या वतीने राजावाडी रूग्णालयात जाऊन पीडित कुंटूंबाची भेट घेतली.

साकीनाका बलात्कारप्रकरणी राजावाडी रूग्णालयाबाहेर भीम आर्मीची निदर्शने
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 5:03 PM
Share

मुंबई : साकीनाका येथे एका पीडितेवर झालेल्या अत्याचारानंतर तिचा आज दुर्दैवी मृत्य झाला. या प्रकरणी भीम आर्मी मुंबई प्रदेशच्या वतीने राजावाडी रूग्णालयात जाऊन पीडित कुंटूंबाची भेट घेतली. यावेळी पीडित कुंटूंबाला भेटण्यासाठी भीम आर्मी मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळ गेले असता त्यांना पोलीसांनी अडवले. भीम आर्मीच्या कार्यकत्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अखेर पोलिसांनी पीडित कुंटूंबाची भेट करून दिली. (Bhim Army protests outside Rajawadi Hospital over Sakinaka rape case)

पीडित कुंटूंबाला भेटून त्यांना दिलासा देण्यात आला. पीडित कुंटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे. केंद्र सरकार मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद अशा यावेळी घोषणा देण्यात आल्या. पीडित कुंटूंबाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भीम आर्मीच्या मुंबई प्रमुख उपाध्यक्ष योगीनी पगारे यांनी केली आहे. या आंदोलनात महादू पवार, अविनाश गरूड, विकी शिंगारे, दिनेश शर्मा, क्रांती खाडे, तृप्ती वाघमारे, बालाजी घाडगे तसेच आझाद समाज पार्टीचे मुंबई अध्यक्ष कैलास जैस्वार आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

बलात्काराची नेमकी घटना काय, तपास कुठपर्यंत पोहोचला?

मुंबईच्या साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरातून या घटनेवर रोष व्यक्त केला जातोय. या घटनेतील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित घटनेची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याबाबतची माहिती देखील दिली.

नेमकं काय घडलं?

“गणेशोत्साव सारख्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या धार्मिक सणामध्ये काल एक अत्यंत दुर्देवी आणि घृणास्पद घटना घडली आहे. अतिशय निंदणीय प्रकार घडला आहे. 9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री साधारण 3 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान साकीनाक्याच्या खैराणी रोड येथे पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉटमनने कंट्रोल रुमला फोन करुन कळवलं की, तिथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवलं”, असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

‘महिलेला रुग्णालयात दाखल केलं’

“संबंधित अधिकारी दहा मिनिटांच्या आतमध्ये पोहोचले. तेव्हा तिथे एका उघड्या टेम्पोच्या आतमध्ये पीडित महिला अत्यंत नाजूक परिस्थित आढळली. त्यावेळी त्यांनी तातडीने निर्णय घेऊन महिलेला इतरत शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी चौकीदाराकडून घेऊन स्वत: पोलिसांनी गाडी चालवत ताबोडतोब राजावाडी हॉस्पिटलमध्ये महिलेला दाखल केलं. डॉक्टरांनी पीडितेवर त्वरित उपचार सुरु केले होते”, अशी माहिती त्यांनी दिलीय.

वॉचमनच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

“पोलिसांनी वॉचमनच्या तक्रारीवरुन साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. साकीनाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी, क्राईम ब्रांचचे कर्मचारी सगळ्यांकडून तपास सुरु होता. संबंधित परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज चेक करण्यात आले. त्यावरुन एक आरोपी ज्याचं नाव मोहन आहे, तो युपीचा राहणारा आहे त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं. या आरोपीचे कपडे जप्त करण्यात आले. त्यावर रक्ताचे काही डाग आढळले आहेत. तपासातून ते महिलेचे रक्ताचे डाग आहेत ते खात्री करावे लागेल”, असं नगराळे म्हणाले.

हेही वाचा

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

आरोपीला 10 दिवसांची कोठडी, मुख्यमंत्री म्हणाले, सोडणार नाही, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!

(Bhim Army protests outside Rajawadi Hospital over Sakinaka rape case)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.