मध्य रेल्वेची मोठी घोषणा, नवे वेळापत्रकही जाहीर

| Updated on: Jun 30, 2019 | 6:03 PM

मध्ये रेल्वेने आज मोठी घोषणा केली आहे. यात अनेक नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली. तसेच काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेची मोठी घोषणा, नवे वेळापत्रकही जाहीर
Follow us on

मुंबई : मध्ये रेल्वेने आज मोठी घोषणा केली आहे. यात अनेक नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली. तसेच गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहे. 1 जुलैपासून या वेळापत्रकाची अंमलबजावणी होणार आहे. या नव्या वेळापत्रकाच्या काही विशेषताही आहेत.

यापुढे सीएसएमटी-गडग एक्स्प्रेस (11139/11140) 1 जुलैपासून आठवड्यातील 6 दिवस धावेल. सोलापूर-कोल्हापुर एक्स्प्रेस (11051/11052) आता सुपरफास्टच्या स्वरुपात 22133/22134 या नव्या रेल्वे क्रमांकासह धावेल. या एक्स्प्रेस रेल्वेचे रुपांतर सुपरफास्टमध्ये झाले आहे. ज्या प्रवाशांनी आधीच आपले तिकिट बुक केले आहे, त्यांच्याकडून प्रवासाच्या वेळी सुपरफास्टप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.

रद्द झालेल्या गाड्या

हुब्बल्ली-एलटीटी एक्स्प्रेस (17321) 5 ऑक्टोबर 2019 पासून, तर एलटीटी-हुब्बल्ली एक्सप्रेस (17322) 6 ऑक्टोबर 2019 पासून रद्द होईल. याखेरीज 1 जुलैपासून काही रेल्वेंचा वेगही वाढणार आहे. मध्य रेल्वेच्या 29 एक्स्प्रेस रेल्वेंचा वेग वाढणार आहे. त्यामुळे 3 मिनिटांपासून 20 मिनिटांपर्यंत लवकर प्रवास पूर्ण होणार आहे. वेग वाढल्याने सोलापूर-कोल्हापूर प्रवासात 65 मिनिटे, तर कोल्हापूर-सोलापूर प्रवासात 120 मिनिटे वाचणार आहेत. मध्य रेल्वेच्या 30 प्रवासी रेल्वेंचाही वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे 5 ते 35 मिनिटे वाचणार आहेत.

रेल्वेच्या वेळात महत्त्वाचे बदल (1 जुलै 2019 पासून लागू)

डाउन रेल्वे
• 11009 मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस दुपारी 02.30 वाजता न सुटता दुपारी 02.25 वाजता सीएसएमटी येथून रवाना होईल.
• 12117 एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस दुपारी 03.00 वाजता निघण्याऐवजी दुपारी 02.55 वाजता एलटीटी येथून निघेल.
• 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस दुपारी 03.00 वाजता निघण्याऐवजी दुपारी 02.55 वाजता सीएसएमटी येथून रवाना होईल.
• 15102 मुंबई-छपरा अंत्योदय एक्स्प्रेस दुपारी 03.35 ऐवजी दुपारी 03.30 वाजता सीएसएमटी येथून निघेल.
• 16381 मुंबई-कन्याकुमारी एक्स्प्रेस सीएसएमटी येथून दुपारी 03.45 वाजता निघण्याऐवजी दुपारी 03.35 वाजता निघेल.
• 22121 एलटीटी-लखनऊ एसी एक्स्प्रेस दुपारी 02.20 वाजता निघण्याऐवजी दुपारी 01.40 वाजत एलटीटी येथून रवाना होईल.
• 12598 मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस दुपारी 02.20 वाजता न निघता दुपारी 01.30 वाजता सीएसएमटी येथून निघेल.
• 22103 एलटीटी-फैजाबाद एक्स्प्रेस दुपारी 02.30 ऐवजी 01.40 वाजता एलटीटी येथून रवाना होईल.
• 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून सकाळी 07.55 वाजता सुटण्याऐवजी सकाळी 08.05 वाजता सुटेल.

अप रेल्वे
• 11054 आजमगड-एलटीटी एक्स्प्रेस दुपारी 12.15 ऐवजी दुपारी 12.05 वाजता एलटीटीला पोहचेल.
• 22148 साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस दुपारी 03.20 ऐवजी 03.10 वाजता दादरला पोहचेल.
• 12870 हावडा-मुंबई एक्स्प्रेस रात्री 11.15 ऐवजी 11.25 वाजता सीएसएमटीला पोहचेल.
• 12112 अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सकाळी 06.25 ऐवजी 06.45 वाजता सीएसएमटीला पोहचेल.
• 12116 सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस सकाळी 06.50 ऐवजी 06.35 वाजता सीएसएमटीला पोहचेल.
• 17412 कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस सकाळी 07.25 ऐवजी 07.35 वाजता सीएसएमटीला पोहचेल.
• 11024 कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस सकाळी 11.50 ऐवजी दुपारी 12.05 वाजता सीएसएमटीला पोहचेल.
• 12052 मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी 11.05 ऐवजी दुपारी 23.15 वाजता दादरला पोहचेल.
• 22133 सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस रात्री 11.35 ऐवजी 11.50 वाजता सोलापूर येथून रवाना होईल आणि सकाळी 06.20 ऐवजी 05.30 वाजता कोल्हापूरला पोहचेल.
• 22134 कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस रात्री 11.55 वाजण्याऐवजी 11.30 वाजता कोल्हापूर येथून रवाना होईल आणि सकाळी 07.35 ऐवजी 05.10 वाजता सोलापूरला पोहचेल.
• 11415 बिदर-कोल्हापूर एक्स्प्रेस रात्री 12.35 ऐवजी 12.25 वाजता कोल्हापूरला पोहचेल.
• 11416 कोल्हापूर-बीदर एक्स्प्रेस कोल्हापूर येथून रात्री 11.25 ऐवजी 11.55 वाजता रवाना होईल.
• 11006 पुदुचेरी-दादर एक्स्प्रेस रात्री 08.47 ऐवजी रात्री 20.50 वाजता मिरज येथून रवाना होईल.
• 11022 तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेस रात्री 08.47 ऐवजी 08.50 वाजता मिरज येथून रवाना होईल.
• 11036 म्हैसूर-दादर शरवती एक्स्प्रेस रात्री 08.47 ऐवजी 08.50 वाजता मिरज येथून रवाना होईल.