AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RTPCR Test : ‘मोठी बातमी, महाराष्ट्रात आता फक्त 500 रुपयात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी’, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने पुन्हा एकदा बदल केले आहेत.

RTPCR Test : 'मोठी बातमी, महाराष्ट्रात आता फक्त 500 रुपयात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी', आरोग्य मंत्र्यांची घोषणा
| Updated on: Mar 31, 2021 | 9:14 PM
Share

मुंबई : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने पुन्हा एकदा बदल केले आहेत. सरकारने जारी केलेल्या सुधारित दराप्रमाणे आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी (RTPCR Test) 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत. अँटीजेन टेस्टसाठी 150 रुपये करण्यात येणार आहेत. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (31 मार्च) ही घोषणा केली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे (Big News Maharashtra government reduce price of all corona test including RTPCR test).

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर नियंत्रित केले आहेत. आतापर्यंत किमान 5 ते 6 वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करण्यात आली. त्यामुळे हे दर 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार 500 रुपयांपर्यंत खाली आलेत. आता खासगी प्रयोगशाळांना 500 रुपयात ही चाचणी करणं बंधनकारक असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

कोरोना चाचणीच्या दरांमधील टप्पेनिहाय कपात

यापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा केली. त्यानुसार अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये असे दर करण्यात आले होते. आजच्या निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारले जातील.

“खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही”

रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नमूद केले.

कोणत्या कोविड चाचणीसाठी किती दर?

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150, 200 आणि 300 असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

‘खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याने निर्णय’

या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत आहे. तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झालाय. राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :

ठाण्यात मॉलमध्ये जायचंय?; मग हे वाचाच, नाही तर भारी पडेल!

नवी मुंबईत अधिक प्रभावीपणे ‘मिशन ब्रेक द चेन’, मॉलमध्ये प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक!

कोकणात शिमग्याच्या उत्साहावर पाणी; पालखीवर निर्बंध, गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक

व्हिडीओ पाहा :

Big News Maharashtra government reduce price of all corona test including RTPCR test

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.