काँग्रेसचा तो Video व्हायरल, भाजपने केला सर्वात मोठा भांडाफोड; थेट दिल्लीत…

भाजपने व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे काँग्रेसच्या दिल्लीतील आंदोलनामागचं सत्य समोर आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांना जबरदस्तीने दिल्लीत बोलावून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा भाजपने केला आहे. राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगसाठी कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्यात येत असून, न आल्यास पदांवरून हटवण्याची धमकी दिली जात आहे.

काँग्रेसचा तो Video व्हायरल, भाजपने केला सर्वात मोठा भांडाफोड; थेट दिल्लीत...
congress
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 11:04 AM

भाजपने आज एक कथित व्हिडीओ व्हायरल करून काँग्रेसबाबतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसने दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनासाठी काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना जबरदस्तीने दिल्लीत बोलावलं जात असून त्यांना धमकावलं जात असल्याचं या व्हिडीओतून उघड झालं आहे. काँग्रेसने थेट कार्यकर्त्यांवरच दादागिरी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपचे प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी आज सकाळी सकाळीच काँग्रेसचा हा व्हिडीओ व्हायरल करून मोठा बॉम्बच फोडला आहे. काँग्रेस आंदोलन यशस्वी करण्यासाठी इच्छा नसतानाही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जबरदस्तीने कसं दिल्लीत बोलावत आहे, याचा पर्दाफाशच नवनाथ बन यांनी केला आहे. राहुल गांधी यांचं रिलॉन्चिंगसाठी पदाधिकाऱ्यांवर हा एकप्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला आहे.

Loading...

राहुल यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही

उद्यापर्यत युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जावं नाही तर कारवाई करेल असे धमकावले जात आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळेच विश्वजीत कदम यांनी आंदोलन सोडून काल दिल्ली गाठली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याचा हा परिणाम आहे, असा दावाही बन यांनी केला आहे.

रिलॉन्चिंगसाठी धमक्या

दिल्लीत आले नाही तर पुन्हा तुम्हाला कुठलेही पद दिले जाणार नाही अशा धमक्या दिल्या जात आहेत. ही कुठली लोकशाही आहे? आज राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगसाठी धमक्या दिल्या जात आहे. दिल्लीत गर्दी जमा करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे, असं बन यांनी म्हटलं आहे.

काय आहे या व्हिडीओत?

या व्हिडीओत काँग्रेसचा एक नेता पदाधिकाऱ्यांना धमकावताना दिसत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांनी कान उघडे ठेवून ऐका, तुम्ही बहाणेबाजी करत आहात. आम्ही पुण्याला आहोत, इकडे गेलो तिकडे गेलो आहोत, असं म्हणत आहात. मी शिवराज यांच्याकडून पुण्यातील अटेन्डन्स घेतली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, तुमचे सर्व साथी उद्या दिल्लीत नाही पोहोचले तर सर्वांना सस्पेंड करून कमिटी भंग करा. ज्यांना कमिटी सुरूच राहावी वाटत असेल, ज्यांना भविष्यात निवडणूक लढायची असेल तर त्यंनी उद्या सकाळी कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत यायचं आहे. नाही तर पुढील कारवाईला तुम्हीच जबाबदार असाल, असं हा नेता पदाधिकाऱ्यांना सांगताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us