AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिला प्रचंड विजय, सोमेश्वर कारखाना निवडणुकीत उघडलं खातं

अजितदादानंतर सुनेत्रा पवार यांचा सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. बारामती येथील या निवडणुकीत त्यांच्या पॅनलने यश मिळवत खाते उघडले. संग्राम सोरटे यांच्या विजयाने राष्ट्रवादीत जल्लोष आहे. अजितदादांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवारांची ही पहिलीच महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे, ज्याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

अजितदादानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिला प्रचंड विजय, सोमेश्वर कारखाना निवडणुकीत उघडलं खातं
Sunetra PawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 10:41 AM
Share

बारामतीतील सोमेश्वर कारखाना निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचंड विजय होताना दिसत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलनं खातं उघडलं आहे. त्यांच्या एका उमदेवाराचा विजय झाला आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर एखाद्या निवडणुकीतील सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच मोठा विजय आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल यायला सुरु झाल आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने खातं उघडलं आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे उमेदवार संग्राम सोरटे हे ब वर्ग गटातून विजयी झाले आहेत. संग्राम सोरटे यांना 131 पैकी 92 मत मिळाली आहेत. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पॅनलसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. ही निवडणूक केवळ बारामतीची असली तरी संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. अजितदादा यांच्या नंतर सुनेत्रा पवार या कशा कामगिरी करतात याकडे हे लक्ष लागलं होतं.

21 पैकी 21 जागा जिंकणारच…

दरम्यान, सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही 21 पैकी 21 जागा जिंकणारच असा निर्धार खासदार पार्थ पवार यांनी केला होता. सोमेश्वर साखर कारखान्याच्या 21 संचालक पदाच्या जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत विजय व्हावा म्हणून पार्थ पवार यांनी विविध मतदान केंद्रांवर जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. सोमेश्वर निवडणुकीत 21-0 असा निकाल लागेल, अशी शक्यता असून आमची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे. विजयाची वाटचाल सुकर होत चालली आहे, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं होतं.

तिरंगी लढत

दरम्यान, सोनेश्वर कारखान्यावर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून संजय जगताप यांच्या मदतीने लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल उभं केलं होतं. या निवडणुकीत तिरंगी लढत होती. मात्र, पहिल्या निकालातूनच जगताप यांना धक्का बसणार असल्याचं दिसून येत आहे. दुपारपर्यंत या निवडणुकीचे सर्व निकाल हाती येणार असून त्यात कुणाचं वर्चस्व राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!