AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय नेत्यांसोबत न्यायाधीश बॅडमिंटन खेळतात, पण… संजय राऊत यांचा हल्लाबोल

संजय राऊत यांनी सरन्यायाधीशांवर तीव्र हल्ला चढवला आहे. राहुल गांधींच्या शिष्टमंडळाला भेटण्यास नकार देणाऱ्या सरन्यायाधीशांना राजकीय नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळायला वेळ मिळतो, पण विरोधी पक्षाचे म्हणणे ऐकायला नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

राजकीय नेत्यांसोबत न्यायाधीश बॅडमिंटन खेळतात, पण... संजय राऊत यांचा हल्लाबोल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 10:15 AM
Share

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरन्यायाधीशांच्या या निर्णयावर टीका केली आहे. सरन्यायाधीशांपासून इतर न्यायाधीशांना इंग्लंडमध्ये राजकीय नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळायला वेळ आहे. पण देशातील विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्यायला वेळ नाही. हे दुर्देव आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरन्यायाधीशांवर हल्ला चढवला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राजकीय नेत्यांना भेटण्याचा आपला अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. अशी भूमिका सरन्यायाधीश सूर्यकांत घेतात तेव्हा लोकशाहीसाठी लढणाऱ्या लाखो नागरिकांना धक्का बसला आहे. आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत. प्रत्येक संवैधानिक संस्थेवर मोदींनी आपली माणसं बसवली आहेत. कोर्ट शेवटचा आधार आहे. चोरी कशी झाली हे सांगण्याचा प्रयत्न विरोधक करतात तेव्हा सरन्यायाधीश दरवाजा बंद करून बसतात हे दुर्देव आहे, असं संजय राऊत म्हणाले.

कॉकरोचचे संस्थापक सरन्यायाधीशच

राजकीय लोकांना भेटण्याचा अधिकार नाही असं सरन्यायाधीश म्हणतात, पण लोक त्यावर विश्वास ठेवणार नाही. 80 पेक्षा अधिक न्यायाधीश इंग्लंडला गेले होते. राजकीय नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळले होते. त्यात मुख्य न्यायाधीश होते. अनेक राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात देशाचे न्यायाधीश उपस्थित राहतात. मुख्यमंत्री न्यायाधीशाच्या स्वागतासाठी डिनर पार्टी ठेवतात. न्यायासनावर बसून न्यायाधीश राजकीय कमेंट करतात. कॉकरोच जनता पार्टीचे खरे संस्थापक सरन्यायाधीशच आहेत. आपल्या पदाचा राजीनामा देऊन अनेक न्यायाधीश राजकारणात सामील झाले आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

कोर्ट ऐकायला तयार नाही

राहुल गांधी आणि त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला भेट नाकारणं दु:खद आहे. कोर्टच व्होट चोरीची अवहेलना करणार असेल तर देशातील जनतेने जायचं कुठे? आम्ही वारंवार सुप्रीम कोर्टात बॅलेट पेपरसाठी गेलो, तेव्हा आमची याचिका फेटाळली. ईव्हीएमचा घोटाळा ऐकायला कोर्ट तयार नाही. पश्चिम बंगालमधील लाखो नावे काढली, तेही ऐकायला कोर्ट तयार नाही. त्यामुळे कोर्टाला सांगायला जातोय जागे व्हा, असं राऊत म्हणाले.

Follow Us
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम