‘पवार पडद्याआडून सूत्रं कशाला हलवतात, त्यापेक्षा उद्धव ठाकरेंना नारळ देऊन तुम्हीच मुख्यमंत्री व्हा’

| Updated on: Jan 15, 2021 | 3:59 PM

पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? | Atul Bhatkhalkar

पवार पडद्याआडून सूत्रं कशाला हलवतात, त्यापेक्षा उद्धव ठाकरेंना नारळ देऊन तुम्हीच मुख्यमंत्री व्हा
Follow us on

मुंबई: धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार (Sharad Pawar) यांनी पडद्याआडून सूत्रे हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन प्रत्यक्ष सत्ताच हातात घ्यावी, अशी खोचक टिप्पणी भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली. गेल्या तीन दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. (Atul Bhatkhalkar slams Sharad Pawar)

या भेटीवर अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार असल्याचे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

IPS विश्वास नांगरे पाटील ‘सिल्वर ओक’वर

धनंजय मुंडेंवरच्या आरोपांनंतर थेट विश्वास नांगरे-पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विश्वास नांगरे-पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोणतंही कठीण प्रकरण सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे विश्वास नांगरे या प्रकरणाची गुंतागुंत कशी सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडे प्रकरणात भाजप नेत्यांमध्येच दोन तट पडलेत का?

मै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय?

मुंबई पोलिसांवर विश्वास, ते मुंडे प्रकरणाचा योग्य तपास करतील : शरद पवार

(Atul Bhatkhalkar slams Sharad Pawar)