मुंबई पोलिसांवर विश्वास, ते मुंडे प्रकरणाचा योग्य तपास करतील : शरद पवार

मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. ते या प्रकरणाचा योग्य तपास करतील, असं शरद पवार म्हणाले.

मुंबई पोलिसांवर विश्वास, ते मुंडे प्रकरणाचा योग्य तपास करतील : शरद पवार
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 3:24 PM

मुंबईराज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर रोकठोक भूमिका मांडली. जोपर्यंत आरोपांमधील सत्यता समोर येत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेत मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. ते या प्रकरणाचा योग्य तपास करतील, असं शरद पवार म्हणाले. (NCP Sharad Pawar Comment On Dhananjay Munde Case Inquiry Mumbai Police)

रेणू शर्मा या गायक महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. तश्या प्रकारच्या तक्रारीची पत्र त्यांनी ट्विट केली आहे. मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाहीय. त्यावर बोलताना पवार म्हणाले, “गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी खोलात जाऊन तपास करावा. मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्णपणे विश्वास आहे. मुंबई पोलिस मुंडे प्रकरणाचा योग्य तपास करतील”, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

“सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावं लागतं, असं सांगताना आरोप झाल्याझाल्या जर लगेचच राजीनामा घेतला गेला तर चुकीचा पायंडा पडेल”, अशी भीती पवारांनी व्यक्त केली.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

नांगरे पाटील यांनी घेतली होती पवारांची भेट

तत्पूर्वी काल (गुरुवारी) धनंजय मुंडे यांचं राजकीय भविष्य टांगणीला लागलं होतं. विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये बैठकींचा सिलसिला पाहायला मिळाला. राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वरिष्ठ नेते तसंच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर पटेल काही निरोप घेऊन पवारांकडे त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्वर ओकवर गेले. तिथे त्यांच्यात आणखी एक बैठक पार पडली. संध्याकाळी 5 च्या सुमारास मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पवारांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले.

एकंदरित धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी त्यांची सविस्तर तक्रार मुंबई पोलिसांमध्ये दिलेली आहे. तसंच या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करणार आहे. अशी सगळी पार्श्वभूमी असताना देखील नांगरे पाटील पवारांना नेमक्या कोणत्या विषयावर भेटले?, या भेटीत काय चर्चा झाली? धनंजय मुंडे यांच्यावर नांगरे पाटील-पवार यांच्यात काही खलबतं झालं का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिले गेले.

पवारांची भेट घेतल्यानंतर नांगरे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सह्याद्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. नांगरे पाटील- उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. पवारांची भेट घेतल्यानंतर नांगरे पाटीलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उत आला होता. (NCP Sharad Pawar Comment On Dhananjay Munde Case Inquiry Mumbai Police)

हे ही वाचा

धनंजय मुंडे प्रकरणात भाजप नेत्यांमध्येच दोन तट पडलेत का?

Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?

धनंजय मुंडे प्रकरणात गेल्या 51 तासात काय घडले?, वाचा 14 मोठ्या घडामोडी…

सत्य समोर यायलाच हवे; समर्थकांचा सोशल मीडियातून DM ना सपोर्ट

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.