AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत; ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याचं मोठं विधान

महायुती सरकारमध्ये आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण यावरून अनेक चर्चा होत आहेत. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असे विधान केले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत; ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याचं मोठं विधान
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (प्रातिनिधिक फोटो)
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 07, 2024 | 8:37 PM
Share

देशातच नाहीतर जगभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे वाजत-गाजत स्वागत झाले. राजकारणी, मोठे सेलिब्रिटींसह सर्वांनीच आपल्या घरात गणरायाची विधिपूर्वक स्थापना केली. आगमन झाल्यावर बाप्पाला भाजपच्या महिला नेत्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं साकडं घातलं. आधीच निवडणुकीनंतर महायुतीमध्ये  मुख्यमंत्री कोण यावरून अनेक चर्चा आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं कोणी घातलं जाणून घ्या.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंगलमय वातावरण आहे. वर्षेभर या दिवसाची वाट पाहतो, गणरायाचे आगमन झाले आहेत. गणराय येतानाचे जे दिवस असतात ते भारावलेले असतात. सर्व नातेवाईक एकत्र येतात. महाराष्ट्रातील जनतेला सुखी-समाधानी ठेव, काही ठिकाणी दुष्काळ पडला तर काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. बळीराजा संकटात आहे, महायुती सरकारच्या माध्यमातून तातडीने मदत पोहोचण्याचं काम झालं आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाचा विकास साधायचा काम महायुती सरकारच्या माध्यमातून झालं आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

एक व्हिजन असणारे नेते देवेंद्र फडणवीस आमच्याकडे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. युवक, दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी असा कोणता घटक नाही, जातीपातीच्या पलीकडे जात काम करणारा आमचा नेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्याच्या अधिकाधिक जागा निवडून येऊ द्या आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करताना बघण्याची संधी गणरायाने आम्हाला द्यावी. ही इच्छा फक्त माझीच नाहीतर समस्त महाराष्ट्रातील भाजप परिवाराची आहे. हीच इच्छा मी गणरायाकडे मागितली असल्याचं चित्र वाघ म्हणाल्या.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले…

आमच्याकडे चेहऱ्याचा वाद नाही. जे मुख्यमंत्री असतात तेव्हा चेहऱ्याचा वाद नसतो. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक होते. निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सांगण्याचा अधिकार मला नाही. आमचं पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. आज सरकार म्हणून आम्ही निवडणुकीचा प्रचार एकत्र करत आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...