गुगली नेमकी कुणी टाकली? शरद पवार यांच्या स्पष्टीकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण शरद पवार यांच्या तोंडी सत्य आणू शकलो याचा आपल्याला आनंद आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

गुगली नेमकी कुणी टाकली? शरद पवार यांच्या स्पष्टीकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 6:23 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलंय. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर डबलगेम केल्याचा आरोप केला होता. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. पण नंतर त्यांनी माघार घेतली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टीकर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे सत्तेसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात हे दाखवण्यासाठी आमच्या भेटीगाठी झाल्या. आम्ही गुगली टाकली आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या भूमिकेवर आता देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“मला खूप आनंद आहे की, कमीतकमी नेमकं खरं काय होतं ते मी शरद पवार यांच्या तोंडावर मी आणू शकलो. पण हे सुद्धा अर्धसत्य आहे. उरलेलं सत्य देखील मी फार लवकर घेऊन येईन. मी सुद्धा गुगली फेकणार आणि उरलेलं सत्य बाहेर येईल. माझ्या एका गुगलीने हे सत्य तर बाहेर आणलंच. आता उरलेलं सत्यदेखील बाहेर येईलच. मी हळूहळू त्यांच्याकडूनच ते सत्य बोलून दाखवेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांना बाहेर पाठिंबा देण्याची भूमिका ही ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होती त्यावेळेला जाहीर केली होती. तो त्या काळचा प्रश्न आहे. यानंतरच्या काळात जे त्यांनी सांगितलं की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली ही गोष्टही खरीय”, असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं.

“त्यांनी स्वत: सांगितलंय की, यासंबंधीचं धोरण मी दोन दिवसांनी बदललं. मी दोन दिवसांत धोरण बदललं तर सोबत यायचं काय कारण होतं? त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? शपथ घ्यायची होती तर ती अशी चोरुन पहाटे का घेतली?”, असा सवाल शरद पवार यांनी केला.

“आमचा त्यांना पाठींबा होता तर ते सरकार दोन दिवसांत राहिलं का? दोन दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजासमोर यायला हवेत या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या”, असा स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.

“देवेंद्र फडणवीस आणि हे सत्तेसाठी काय करु शकतात, कुठे जाऊ शकतात, हे सगळं समजण्याची ही स्थिती आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.

“हा डाव होता का ते मला माहिती नव्हतं. पण कदाचित लोकांना तुम्हाला माहिती असेल की नसेल ते मला माहिती नव्हतं. पण माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सधू शिंदे असं होतं. ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. या गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या लोकांचे विकेट घेतले होते. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? मी जरी खेळलो नसलो तरी माहिती होतं. यापेक्षा जास्त मला काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे”, असं शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.