BREAKING | अजित पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार? पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले

"कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यात वावगं काही नाहीय. राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकतं की, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

BREAKING | अजित पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार? पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 8:24 PM

मुंबई | 24 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना सध्या प्रचंड उधाण आलं आहे. दिवसभरात आज याचे पडसाद उमटलेले बघायला मिळाले. राष्ट्रवादीचे मंत्री अनील पाटील यांनी तर खूप मोठं वक्तव्य केलं. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांची इच्छा असल्याचं पाटील म्हणाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली. या सर्व चर्चांवर आता अखेर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

“कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यात वावगं काही नाहीय. राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकतं की, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकतं की भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही बदल होणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

‘अजित पवार यांना आधीच स्पष्टपणे कल्पना दिलेली…’

“या संदर्भात अजित पवार आणि मी, आमच्या दोघांच्या मनात पूर्ण स्पष्टता आहे. ज्यावेळी महायुतीची पूर्ण चर्चा झाली त्यावेळेसही अजित पवार यांना याबाबतची स्पष्टपणे कल्पना देण्यात आली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. केवळ स्वीकारलीच नाही तर त्यांनी स्वत: आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

‘एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार’

“जे लोकं अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत त्यांना माझं अतिशय स्पष्टपणे सांगणं आहे की, अशा प्रकारचे संकेत देणं किंवा संभ्रम निर्माण करणं त्यांनी तात्काळ बंद केलं पाहिजे. कारण महायुती संदर्भात संभ्रम तयार होतो. नेत्यांच्या मनात संभ्रम नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये”, असं फडणवीसांनी आवाहन केलं.

‘आता झालाच तर आमचा विस्तार होईल’

“काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, अशाप्रकारची पंतगबाजी सध्या अनेक लोकं करत आहेत. अनेक लोकं राजकीय भविष्यवेत्ते झाले आहेत. पण त्यांनी किती भविष्य सांगून आमच्या युतीत किंवा राज्याच्या जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी दहा, अकरा तारखेला काही होणार नाही. झालंच काही तर आमचा विस्तार होणार आहे. त्याची तारीख ठरायची आहे. मुख्यमंत्री ठरवतील तेव्हा विस्तार होईल”, असं फडणवीसांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.