आता मामुला सांगा दुसर्‍याला मामा बनवू नये… किरीट सोमय्यांनी डिवचले कुणाला? होणार मोठा राडा?

Kirit Somaiya on Uddhav Thackeray: मुंबईतील वांद्रे पूर्व येथील गरीब नगरमध्ये पाच दिवस अतिक्रमण हटाव मोहिम राबवली गेली. त्यात 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या जागेची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले.

आता मामुला सांगा दुसर्‍याला मामा बनवू नये... किरीट सोमय्यांनी डिवचले कुणाला? होणार मोठा राडा?
किरीट सोमय्या
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 24, 2026 | 1:38 PM

Kirit Somaiya on Uddhav Thackeray: मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगरमधील अतिक्रमणावर हतोडा पडला. पाच दिवसांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी आज या भागाची पोलीस बंदोबस्तात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. काय म्हणाले सोमय्या?

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर टीका केली. आज इथं येऊन समाधान वाटत असल्याचे ते म्हणाले. इथे सगळे अतिक्रमण केलेले होतं. आता सहा महिन्यानंतर येथे विकसित टर्मिनल दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अगदी दीड फुटावर इथे एक नेते राहतात त्यांच्या आमदार या बांगलादेशी रोहिंग्या वोट जिहाद मतांवर निवडून आला, अशी जहरी टीका त्यांनी सेनेवर केली. आता त्यांना हे मतदार कमी होण्याची भीती वाटते, असे ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी रोहिंग्या वोट जिहाद मतांवर राज करत होत्या. आता उद्धव ठाकरे यांचे असेच होणार, असे सोमय्या म्हणाले. म्हणून याभागात दंगल भडकवणं, दगडफेक करणं असे प्रकार घडले. आता मामुला सांगा दुसऱ्याला मामा बनवू नये. हे अधिकृत होते का? यांच्याकडे इथलं कागदपत्र आहे का? न्यायालयात का आहे मामू गेले नाही. आता मूर्ख बनवायचे धंदे बंद करा. वरुण सरदेसाईंच्या वक्तव्यावर बोलताना किरीट सोमय्या यांनी अशी टीका केली. हेच माजी मुख्यमंत्री धारावीच्या मशिद वाचवण्यासाठी गेले होते असा आरोपही त्यांनी केला. ही तर सुरुवात आहे अजून काही प्रकल्प आहे. तिथे पण सुरुवात होणार आहे, असा इशारा दिला. एकाही बांगलादेशीला घर मिळणार नाही.. वोट जिहाद, लँड जिहाद वाले जे धंदा करतात ना त्यांना धडा शिकवणार आहेत, असे सोमय्या म्हणाले.

400 हून अधिक बांधकामे हटवली

या मोहिमेत पालिकेने 400 हून अधिक पत्र्याची दुमजली, तीन मजली घर हटवली. तर पुनर्वसनासाठी पात्र ठरलेल्या 100 झोपड्यांना कायम ठेवण्यात आले असले तरी, त्यांच्यावरील अनधिकृत उभारलेली अतिरिक्त मजले यंत्रांऐवजी मनुष्यबळ वापरून हटवण्यात आली. शुक्रवारी आणि शनिवारी ही कारवाई करण्यात आली.

Follow Us